मारुतीच्या या प्लाननी महिन्याला कमवा एक लाख रुपये

भारतातली मोठी कार बनवणारी कंपनी मारुती सुझुकी इंडिया भारतातला त्यांचा व्यवसाय वाढवण्याच्या विचारात आहे

Updated: Oct 30, 2017, 05:36 PM IST
मारुतीच्या या प्लाननी महिन्याला कमवा एक लाख रुपये  title=

मुंबई : भारतातली मोठी कार बनवणारी कंपनी मारुती सुझुकी इंडिया भारतातला त्यांचा व्यवसाय वाढवण्याच्या विचारात आहे. यासाठी कंपनीनं 2017-18 या वर्षामध्ये एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं बजेट ठेवलं आहे. 2020पर्यंत मारुती सुझुकी देशभरात 1,500 नव्या डिलरशीप उघडण्याचा विचार करत आहे.

व्यवसाय वाढवण्यासाठी मारुती सुझुकीनं जमीन खरेदी करायला सुरुवात केली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना आणि बजेट असणाऱ्यांसाठी मारुती सुझुकीची डिलरशीप मिळू शकते. कंपनीच्या या प्लॅनमुळे महिन्याला एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्तची कमाई करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये कंपनी एक हजार कोटी रुपये खर्च करून जमीन विकत घेणार आणि त्यावर शोरूम बनवून विक्रेत्यांना लीजवर देणार आहे. सध्या मारुतीच्या 1,700 शहरांमध्ये 2,069 डीलरशीप आहेत, तर 3,293 सर्व्हिस सेंटर आहेत. 2020पर्यंत मारुती सुझुकीचं प्रत्येक वर्षी 20 लाख गाड्या विकण्याचं लक्ष्य आहे. मागच्या आर्थिक वर्षात कंपनीनं 15 लाख गाड्या विकल्या होत्या.

मारुती सुझुकीकडे सध्या 31 हजार कोटींचं कॅश रिजर्व आहे. कंपनी त्यांच्या 280 प्रिमियम रिटेल चेन नेक्साच्या मार्फत गाड्यांची विक्री करते. मारुती स्विफ्ट डिझायर, वेगन आर आणि ऑल्टो 800 या सर्वाधिक विक्री होणाऱ्या गाड्या आहेत.