Mahindra New Electric Car Feature : महिंद्रानं दोन इलेक्ट्रिक गाड्या BE 6e आणि XEV 9e ला नुकतंच लॉन्च केलं आहे. या गाड्यांमध्ये कोणते टॉप फीचर्स आहेत हे जाणून घेऊया. महिंद्रानं भारतात दोन दमदार इलेक्ट्रिक गाड्या लॉन्च केल्या आहेत. या इलेक्ट्रिक गाड्या आहेत. यावेळी सुरक्षा ते मनोरंजन प्रवाशाच्या सगळ्या गोष्टींचा विचार करून यात वेगवेगळे फीचर्स दाखवण्यात आहेत. महिंद्रानं भारतात दोन इलेक्ट्रिक कार लॉन्त केल्या आहेत. या इलेक्ट्रिक गाडीत लोकांना सेफ्टी ते मनोरंजनासोबत अनेक फीचर्स दिले आहेत.
महिंद्रा XEV 9e मध्ये तीन स्क्रीन लावण्यात आले आहेत. या कारमध्ये प्रवाशाला प्रवास करताना कंटाळ येणार नाही याची संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळेच यात वेगवेगळे फीचर्स देण्यात आले आहेत. कोणतीही गाडी असली तरी सगळ्यात महत्त्वाचे त्याचे फीचर्स असतात. महिंद्रानं त्याच्या दोन्ही इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये अनेक नवीन फीचर्स दिले आहेत. त्यांच्या या दोन्ही नवीन गाडीत Dolby Atmos सोबत हरमन कार्डनचे 16-स्पीकर ऑडियो सिस्टम लावण्यात आले आहेत. त्यासोबत या गाड्यांमघ्ये सोनिक ट्यून्स फेमस कंपोजर ए आर रहमाननं बनवली आहे.
हेही वाचा : Vitamin D Deficiency: सूर्यप्रकाशात ठेवलेलं पाणी प्यायल्यानं मिळतं व्हिटामिन डी?
मार्केटमध्ये आलेल्या या गाड्यांमध्ये 360 डिग्री कॅमेरा फीचर आहे. पण महिंद्राच्या या इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये ऑटोपार्क फंक्शन देण्याक आलं आहे. यामुळे कुठेही रिमोट कंट्रोल पार्किंग द्वारे तुम्ही गाड्या उभ्या करू शकतात. या इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये पॅनोरमिक सनरुफ, डिजिटल इंस्ट्रमेंट क्लस्टर आणि सेंट्रल टचस्क्रीन डॅशबोर्ड सारखे फीचर्स मिळतात. या गाड्यांमधअये इनफिनिटी रुफ देण्यात आलं आहे. यात एंबिएंट लायटिंगला ग्लास रुफ देण्यात आलं आहे. महिंद्रा BE 6e ला 18.90 लाख रुपयांपासून सुरुवात आहे. तर महिंद्रा XEV 9e ची किंमत ही 21.90 लाख रुपयांपासून सुरु होते. ऑटोमेकर्स या गाड्यांची डिलीव्हरी मार्च 2025 पासून सुरु होते. त्यामुळे आता गाडी घ्यायचा विचार करत असाल तर सगळ्या गोष्टींचा आणि मिळणाऱ्या या सगळ्या फीचर्सचा नक्कीच विचार करा.