मुंबई : महिंद्रा मोटर्स लवकरच आपली नवी एसयूवी कार लॉन्च करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी वॅलेंटाइन डेच्या दिवशी हे गाडी लॉन्च करु शकते. कॉम्पॅक्ट एक्सयूवी 300 ही महिंद्रा नवी कार लवकरच लॉन्च होणार आहे. एसयूवी 300 चा एक व्हिडिओ महिंद्राने शेअर केला आहे. ज्यामध्ये या कारचा जबरदस्त परफॉर्मेंस पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये गाडीच्या फीचर्स बद्दल सांगण्यात आलं आहे. 2 मिनिटं 15 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये आशिया पॅसिफिक रॅलीचे चॅम्पियन गौरव गिल ही कार ड्राइव्ह करताना दिसत आहेत.
ऑटो सेक्टरमधील तज्ज्ञांच्या मते, महिंद्रा एक्सयूवी 300 ची तुलना फोर्ड ईकोस्पोर्ट, टाटा नेक्सॉन आणि मारुती सुजुकी विटारा ब्रेजा सोबत केली जात आहे. सोबतच याची तुलना हुंडईच्या क्रेटाशी केली जात आहे. या कारची प्री बुकिंग सुरु झाली आहे. कारच्या प्री बुकिंगसाठी ग्राहकांना 20,000 रुपये जमा करावे लागणार आहे. याची एक्स शोरुम किंमत 8 लाख ते 12 लाख रुपयांच्या मध्ये असू शकते.
महिंद्रा एक्सयूवी 300 मध्ये कंपनीने अनेक नवे फीचर्स दिले आहेत. कंपनीने एसयूवी 300 चं डिझाईन SsangYong Tivoli X100 प्रमाणे केलं आहे. कंपनीचा दावा आहे की, ही नवी एसयूवी 300 मध्ये सेफ्टीसाठी विशेष काळजी घेतली आहे. यामध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पर्याय देण्यात येणार आहे. 1.5-लीटर डिझेलमध्ये इंजिन 300 एनएम टॉर्क जनरेट करणार आहे. तर 1.2 लीटर पेट्रोलमध्ये इंजिन 200 एनएम टार्क जनरेट करणार आहे. महिंद्रा एक्सयूवी 300 च्या चार वेरियंट बाजारात उपलब्ध होणार आहेत. ज्यामध्य़े W4,W6,W8 आणि W8 (O) यांचा समावेश आहे.