लिम्का बुक रेकॉर्ड, एका मिनिटात तब्ब्ल २१७ पंच

रोहित भोरे या तरुणाने एका मिनिटात २१७ पंच मारत विक्रम प्रस्थापित केला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 16, 2020, 12:13 AM IST

अंबरनाथ : रोहित भोरे या तरुणाने एका मिनिटात २१७ पंच मारत विक्रम प्रस्थापित केला आहे. रोहितच्या या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली. कराटेमधला 'चुदान झुकी' प्रकार म्हणजे छातीच्या स्तरावर एका मिनिटात तब्ब्ल २१७ पंच मारून त्याने हा विक्रम प्रस्थापित केला आहे.

रोहितला लिम्का बुक रेकॉर्डसाठी एका मिनिटात १५० पंच मारायचे होते,मात्र त्याने त्याही पुढे जाऊन २१७ पंच  मारले .आता पर्यंत कराटे प्रकारातील लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमधील हा पहिला रेकॉर्ड असल्याचं रोहित सांगतो. 

यावेळी अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. रेकॉर्ड झाल्यावर सगळ्यांनी रोहितचं कौतुक केलं. आता पुढे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी तयारी करणार असल्याचे रोहितने सांगितलं.