नवी दिल्ली: निसान ऑटोमोबाईल कंपनीची एसयूव्ही किक्स आज लॉन्च होणार आहे. निसान कंपनीने या गाडीचे बुकिंग ऑनलाइन आणि ऑफलाइन सुरु केले होते. या गाडीला बुक करण्यासाठी २५ हजार रुपये द्यावे लागणार आहेत. ही रक्कम रिफंडेबल आहे. निसान किक्सची किंमत १० लाखांपासून १४ लाखांपर्यंत असू शकते. ग्राहकांसाठी निसान कंपनीने त्यांच्या एसयूव्ही गाडीला ७ रंगात उपलब्ध करुन दिले आहे.
सुरुवातीला दोन इंजिनसोबत केवळ मॅन्युअल ट्रान्समिशन मिळणार आहे. डिझेलचे इंजिन ११० पीएस पॉवर आणि २४० एनएम पीक टॉर्क जनरेट करणार आहे. या गाडीत ६ स्पीड बॉक्स गिअर देण्यात आले आहेत. तसेच पेट्रोल इंजिन १०६ पीएस पॉवर आणि १४२ एनएम पीक टार्क जनरेट करणार आहे. यात ५ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. निसान किक्सचे पेट्रोल व्हर्जन प्रतिलिटर १४.२३ किमीचा मायलेज देणार आहे. त्याचबरोबर डिझेल व्हर्जन प्रतिलिटर २०.४५ किमी मायलेज देणार आहे. मात्र, या गाडीत ऑल-व्हील ड्राइव्ह सारखा पर्याय मिळणार नाही.
किक्समध्ये ड्युअल- एअरबॅग्ज, फ्रंट सीट बेल्ट, रिअर पार्किंग सेंसर, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट, एलइडी प्रोजेक्टर, ३६0 कॅमेरा सपोर्ट, ऑटो क्लाइमेट कंट्रोल यासारखे फिचर देण्यात आले आहेत.