Laptop Which Cost More Than Car: जगप्रसिद्ध कंप्युटर निर्मिती करणारी कंपनी असलेल्या लेनोवो कंपनीने एक नवा लॅपटॉप बाजारात आणला आहे. हा एक गेमिंग लॅपटॉप आहे. लेनोवो लिगॉन नाईन आय (Lenovo Legion 9i) असं या लॅपटॉपचं नाव आहे. या लॅपटॉपची किंमत तब्बल साडेचार लाख रुपये इतकी आहे. अॅपल कंपनीच्या मॅकपेक्षाही ही किंमत फारच जास्त आहे. मात्र असं असल्यानेच या लॅपटॉपमध्ये नेमकं असं काय देण्यात आलं आहे की त्याची किंमत एवढी जास्त ठेवण्यात आली आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. Lenovo Legion 9i चे फिचर्स काय आहेत, त्याची वैशिष्टये काय आहेत ज्यामुळे त्याची किंमत ऐवढी अधिक ठेवण्यास आली आहे? असे प्रश्न पडणं सहाजिक आहे. मात्र या लॅपटॉपचे कॉन्फिगरेशन आणि स्पेसिफिकेशन्स पाहिल्यावर गेमिंगची उत्तम जाण असलेल्यांसाठी हा लॅपटॉप असल्याचं लगेच लक्षात येतं. या लॅपटॉपबद्दल जाणून घेऊयात...
Lenovo Legion 9i ची भारतामधील किमान किंमत 4 लाख 49 हजार 990 रुपये इतकी आहे. हा लॅपटॉप लेनोवोच्या अधिकृत वेबसाईटवर, एक्सक्लूझिव्ह स्टोर्स, प्रमुख ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्समधून विकत घेता येईल. या लॅपटॉपची किंमत जवळपास टाटा पंच या कारच्या किंमतीएवढी आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, Lenovo Legion 9i मध्ये 16 इंचाची मिनी एलईडी डिस्प्ले आहे. तसेच हा लॅपटॉप फारच पातळ आहे. या लॅपटॉपचं रेझोल्यूशन 3.2 के इतकं आहे. या लॅपटॉपमधील रिफ्रेश रेट 165 एचझेड इतका आहे. यामुळे डिस्प्लेला 3 मायक्रो सेकंद रिस्पॉन्स टाइम आणि 1200 निट्स पीक ब्राइटनेस मिळते. यामध्ये कंपनीने डॉल्बी व्हिजनची सुविधाही दिली आहे.
लेनोवोने या लॅपटॉपमध्ये दिलेल्या आरजीबी बॅकलिट किबोर्डमध्ये 8 सिरॅमिक कॅप्स दिल्या आहेत. या कॅप्स स्वॅप करता येतात म्हणजेच त्यांची आदला बदल करता येते. या लॅपटॉपचा स्पीकर जबरदस्त आहे. यामध्ये 2 वॉटचे नाहिमिक स्पीकर लावण्यात आले आङेत. यामध्ये एक बिल्ट इन वेब कॅम असून तो 1080 पी पर्यंत सपोर्ट करतो.
परफॉर्मन्सबद्दल सांगायचं झाल्यास Lenovo Legion 9i मध्ये 13 व्या जनरेशनचं इंटेल आय 9 प्रोसेसर देण्यात आला आहे. याला आरटीएक्स 4090 16GB GDDR6 किंवा आरटीएक्स 4080 12GB GDDR6 ग्राफिक्स कार्डबरोबर सेट करता येईल. या लॅपटॉपमध्ये 32 जीबी आणि 64 जीबी ड्युएल चॅनेल डीडीआर फाव्ह रॅम देण्यात आली आहे. स्टोरेज 2 जीबीपर्यंत आहे. म्हणजे यात अनेक गेम्स सेव्ह करता येतील.
गेमिंगदरम्यान लॅपटॉप ओव्हर हीट होऊ नये, तापू नये म्हणून Lenovo Legion 9i लीजन कोल्डफ्रण्टचं लिक्विड कूलिंग सिस्टीम देण्यात आली आहे. कंपनीने यामध्ये 99.99 डब्यूएच आर की बसवली आहे. असा दावा केला जात आहे की याचा चार्जर बॅटरीला 30 मिनिटांमध्ये 70 टक्क्यांपर्यंत चार्ज करु शकतो. चार्जरचे 2 पर्याय देण्यात आले आहेत. 330 डब्लू स्लिम अॅडप्टर घेता येतो किंवा 140 डब्लूचा युएसबी-सी पॉवर डिलेव्हरी अॅडप्टरचा दुसरा पर्याय आहे.