तुमच्याही Laptop ची बॅटरी लवकर उतरते का? नेमकं काय करायचं जाणून घ्या

तुमच्या आरोग्यासोबतच आता Laptop च्या बॅटरीचं करा हेल्थ कार्ड चेक, वाचा कसं करायचं

Updated: Aug 19, 2021, 07:53 PM IST
तुमच्याही Laptop ची बॅटरी लवकर उतरते का? नेमकं काय करायचं जाणून घ्या title=

मुंबई: बऱ्याचदा काम करताना आपल्याला लॅपटॉपच्या बॅटरीचा त्रास होतो. कधी बॅटरी उतरते तर कधी बॅटरी संपल्याने बंद पडतो. कोणताही नवीन लॅपटॉप घेण्याआधी त्याची बॅटरी किती काळ टिकेल असा प्रश्न पडतो. बऱ्याच वेळा कंपन्यांनी दावा केलेला बॅटरी बॅकअप आपल्याला लॅपटॉप घेतल्यावर मिळत नाही. 

काही वेळा कालांतराने लॅपटॉपची बॅटरी लवकर संपण्याच्या तक्रारी होतात. पुन्हा तेवढाच बॅटरी बॅकअप घेण्यासाठी नवीन बॅटरी खरेदी करावी लागते. आज आपण बॅटरीचं हेल्थ कसं चेक करायचं ते जाणून घेणार आहोत. विंडोज 10 सिस्टीम वापरत असणाऱ्या युझर्सना अनेक मार्गाने हे चेक करता येत.

पहिल्यांदा तुमच्या लॅपटॉपवर कमांड प्रॉम्प्ट लाँच करा. स्टार्ट मेनूममध्ये जाऊन तुम्हाला  'Cmd' किंवा 'Command' सर्च करायचं आहे. ते सर्च केल्यावर तिथे क्लीक करा. तुम्हाला कमांड प्रॉम्प्ट विंडो दिसेल. तुमच्या लॅपटॉपवर एक ब्लॅक विंडो दिसेल. powercfg /batteryreport तिथे शब्दामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर Enter बटण दाबायचं आहे.

आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर एक मेसेज दिसेल. त्या मेसेजमध्ये एक फाइल पाथ सोबत 'Battery life report saved' असा पर्याय दिसेल. त्या फाइलपाथमध्ये बॅटरी रिपोर्ट लोकेशन असेल.  C:\Users\[Your_User_Name]\battery report असा एक फोल्डरच सी ड्राईव्हला सेव्ह झालेला दिसेल. 

आता फाइल एक्सप्लोररसह फोल्डर उघडा. त्यानंतर फाईल पाथ कॉपी करा. तो फाइल एक्सप्लोररच्या अॅड्रेस बारमध्ये एंटर करू शकता आणि नंतर Enter दाबा. या शिवाय तुम्ही हा पाथ क्रोमच्या अॅड्रेस बारमध्ये देखील उघडून पाहू शकता. 

तुमच्या लॅपटॉपमध्ये इंन्स्टॉल बॅटरीमधील पूर्ण बॅटरीचा रिपोर्ट येईल. यावेळी बॅटरीच्या कॅपेसिटीवर लक्ष देणं गरजेचं असणार आहे. तुमची बॅटरी लॅपटॉप घेताना किती काम करत होती. पूर्ण चार्ज झाल्यानंतर किती क्षमता आहे आणि त्यानंतर आताच्या क्षणी तुमची बॅटरी कशी आहे या सगळ्याचा लेखाजोखा या ग्राफमधून दिसणार आहे.