कावासाकीने लॉन्च केली नवी Ninja 650

जपानी वाहन निर्माता कंपनी कावासाकीने भारतीय बाजारात आपली निंजा 650(Ninja) बाईकचं नवं एडिशन लॉन्च केलं आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 12, 2017, 04:27 PM IST
कावासाकीने लॉन्च केली नवी Ninja 650  title=

नवी दिल्ली : जपानी वाहन निर्माता कंपनी कावासाकीने भारतीय बाजारात आपली निंजा 650(Ninja) बाईकचं नवं एडिशन लॉन्च केलं आहे.

केआरटी एडिशन (कावासाकी रेसिंग टीम) ची निंजा 650 ही बाईक ब्लॅक, ग्रे आणि ग्रीन कलर्समध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

किंमतीचा विचार केला तर नव्या एडिशनची किंमत साधारण Ninja 650 पेक्षा 16 हजार रुपयांनी अधिक आहे. कंपनीने नव्या बाईकमध्ये कुठलंही मेकॅनिकल बदल केलेले नाहीयेत. केवळ कलर आणि ग्राफिक्स देण्यात आले आहेत.

बाईकचं इंजिन आणि फिचर्स...

कावासाकी Ninja 650 ला शुन्याहून 100 किमी प्रति तासाचा स्पीड घेण्यासाठी केवळ 4.65 सेकंदांचा वेळ लागतो. नव्या बाईकची स्टाईल ही कावासाकी ZX-10R सारखी आहे.

इंजिनचा विचार केला तर Ninja 650 KRT मध्ये जुनचं 649 सीसी पॅरेलल ट्विन इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 67.2 बीएचपीची पावर आणि 65.7 एनएमचं टॉर्क जनरेट करतं.

Kawasaki Ninja 650 KRT launch in India, Ninja 650 new features, Ninja 650 KRT price, latest bike launch, Business news in Hindi, latest news

या इंजिनला 6 स्पीड गेअरबॉक्सने जोडण्यात आलं आहे. ही बाईक 15 नोव्हेंबरनंतर सर्व कावासाखी डिलर्सकडे उपलब्ध असणार आहे.

Ninja 650 बाईकची किंमत...

केआरटी एडिशन (कावासाकी रेसिंग टीम) असलेल्या Ninja 650 बाईकची किंमत 5.49 लाख रुपये (एक्स-शो रुम) ठेवण्यात आली आहे.