भविष्यात डेबिटकार्ड, क्रेडीट कार्ड निरूपयोगी ठरणार

  येत्या ३-४ वर्षांमध्ये डेबिट कार्ड आणि क्रेडीट कार्ड यांचा वापर निरूपयोगी ठरणार असल्याचं भाकीत नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी वर्तवले आहे. 

Updated: Nov 12, 2017, 09:23 AM IST
भविष्यात डेबिटकार्ड, क्रेडीट कार्ड निरूपयोगी ठरणार  title=

नोएडा :  येत्या ३-४ वर्षांमध्ये डेबिट कार्ड आणि क्रेडीट कार्ड यांचा वापर निरूपयोगी ठरणार असल्याचं भाकीत नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी वर्तवले आहे. 

 भारतील सुमारे ७२ % लोकसंख्या ही तरूण आहे. त्यांचे वय ३२ पेक्षाही कमी आहे. त्यांचा भविष्यात त्यांचा कल मोबाईलद्वारा पेमेंट करण्याकडे अधिक असेल असा आशावाद त्यांनी मांडला आहे. 
 अमेरिका, युरोप सारख्या देशांच्या तुलनेत तरूण लोकसंख्या अधिक असणं ही गोष्ट भारताच्यादृष्टीने फायद्याची आहे. 

 अमेटी विश्वविद्यालयातील नोएडा कॅम्पसमध्ये एका सभेदरम्यान कांत यांनी आपले विचार मांडले. यावेळेस त्यांना अमेटी विश्वविद्यालयाकडून डॉक्टरेट ही पदवीदेखील देण्यात आली. 

 मोठ्या प्रमाणात बायोमेट्रिक डाटा उपलब्ध असणारा भारत हा सध्या एकमेव देश आहे. त्यामुळे निश्चितच भविष्यात या गोष्टींचा वापर अधिक चांगल्या सुविधांसाठी केला जाऊ शकतो. त्यापैकी एक म्हणजे मोबाईलद्वारा होणारा  आर्थिक व्यवहार.