जिओची भन्नाट ऑफर, 'हे' करा आणि भेटा शाहरुख खानला

तुम्ही ज्या 10 जणांना आंमत्रण पाठवलेल्या पैकी एकाने जरी जिओचे सिम कार्ड खरेदी केल्यास, तुम्ही या ऑफरसाठी पात्र ठराल.

Updated: Dec 26, 2018, 01:47 PM IST
जिओची भन्नाट ऑफर, 'हे' करा आणि भेटा शाहरुख खानला  title=

मुंबई :  रिलायन्स जिओ टेलिकॉम क्षेत्रात आल्यापासून ग्राहक खऱ्या अर्थाने राजा झाला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जिओमुळे इतर कंपन्यांचे कॉल-इंटरनेटचे दर घसरले. यामुळे ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध झाले. जिओने सुरुवातीपासूनच ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर्स दिल्या आहेत. टेलिकॉम क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी आणि ग्राहकांना नेहमी चांगली सुविधा देण्याचा जिओचा मानस असतो. यासाठी नानाविध उपक्रम जिओतर्फे राबवले जातात. आता जिओ आपल्या ग्राहकांना अभिनेता शाहरुख खानला भेटण्याची संधी देत आहे. यासोबतच अनेक ऑफर्स देखील देत आहे.

ऑफर्सची माहिती 

जर तुम्ही जिओचे ग्राहक असाल तर तुम्हाला My Jio App डाउनलोड करावा लागेल. अॅप डाउनलोड केल्यानंतर तिथे एक कॉन्टेस्ट नजरेस पडेल. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या भाग्यवान विजेत्याला शाहरुख खानला भेटण्याची संधी मिळणार आहे. कॉन्टेस्टवर क्लिक केल्यानंतर एक पेज दिसेल. तिथे या संपूर्ण स्पर्धेबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध असेल.

असा घ्या सहभाग

जिओच्या या ऑफरमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला ऑफरमध्ये दिलेल्या Participate Now या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर एक पेज ओपन होणार. त्यात स्पर्धकासाठी एक मेसज असणार आहे. हा मेसेज स्पर्धकाला आपल्या ओळखीच्या दहा लोकांना पाठवयाचे आहे. तुम्ही ज्या 10 जणांना आंमत्रण पाठवलेल्या पैकी एकाने जरी जिओचे सिम कार्ड खरेदी केल्यास, तुम्ही या ऑफरसाठी पात्र ठराल. आणि तुम्हाला शाहरुख खानला भेटण्याची संधी मिळू शकते.      

ही आहे अट

जिओच्या या ऑफरचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत. या ऑफर स्पर्धेत भाग घेण्यासाठी तुम्हाला आपल्या मित्रांना-नातेवाईकांना जिओ नेटवर्क सेवा वापरण्यासाठी आमंत्रित करावे लागेल. जर हे आमंत्रण यशस्वी ठरले आणि आमंत्रित केलेल्या व्यक्तीने जर जिओचं सिमकार्ड खरेदी केले तर दोघांना शाहरुख खानला भेटता येणार आहे.

खास ऑफर

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला काही ना काही बक्षिस निश्चित मिळणार आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सिनेमाची दोन तिकीटे, 100 रुपयांच डेटा व्हाउचर मिळू शकते. यापैकी कोणतेही एकच बक्षिस सहभाग घेणाऱ्याला मिळणार आहे. याशिवाय AJIO.com, EaseMy Trip, Faasos, shopclues, Oyo, VLCC, Puma, Lenskart यासारख्या प्रसिद्ध ब्रांडेड कंपनीचे डिस्काउंट कूपन सहभागी स्पर्धकांना मिळतील.