रिलायन्स जिओनं वाढवली ही ऑफर

रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर घेऊन येत आहे.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Dec 6, 2017, 09:49 PM IST
रिलायन्स जिओनं वाढवली ही ऑफर title=

मुंबई : रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर घेऊन येत आहे. दिवाळीमध्ये जिओनं ग्राहकांसाठी बऱ्याच वेगवेगळ्या ऑफर आणल्या होत्या. नोव्हेंबरमध्ये जिओनं कॅशबॅक ऑफर आणली होती. या ऑफरची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर होती पण आता या ऑफरची शेवटची तारीख 15 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही ऑफर फक्त ऑनलाईन रिचार्ज केल्यावर मिळणार आहे.

अशी आहे स्कीम

399 रुपयांचं रिचार्ज केल्यावर ग्राहकांना 400 रुपयांचं कॅशबॅक मिळणार आहे. यामध्ये 50-50 रुपयांची 8 व्हाऊचर्स देण्यात येणार आहेत. या व्हाऊचर्समुळे पुढच्या 8 रिचार्जमध्ये ग्राहकांना 50-50 रुपयांचा डिस्काऊंट मिळणार आहे. म्हणजेच 399 रुपयांचं रिचार्ज 349 रुपयांना मिळणार आहे. 

हे 400 रुपये जिओ अॅपमध्ये मिळतील तर 300 रुपये मोबाईल वॉलेटमध्ये आणि उरलेले पैसे शॉपिंग व्हाऊचरमध्ये मिळणार आहेत.

मोबिक्विकवर ही ऑफर

मोबिक्विकवर जिओच्या नव्या ग्राहकांनी 399 रुपयांचं रिचार्ज करताना NEWJIO हा कोड टाकल्यावर ग्राहकांना 300 रुपये कॅशबॅक मिळणार आहे. तर जुन्या ग्राहकांनी JIO149 कोड टाकल्यावर 149 रुपयांचं कॅशबॅक मिळेल.

अॅमेझॉन-पेटीएमवरही कॅशबॅक

अॅमेझॉनवरून 399 रुपयांचं रिचार्ज केल्यावर नव्या ग्राहकांना 99 रुपये कॅशबॅक मिळेल. तर जुन्या ग्राहकांना 20 रुपयांचं कॅशबॅक देण्यात येईल.   

पेटीएमवरून जिओचं 399 रुपयांचं रिचार्ज करताना नव्या ग्राहकांना NEWJIO कोड टाकल्यावर 50 रुपये कॅशबॅक मिळेल. जुन्या ग्राहकांना PAYTMJIO कोड टाकल्यावर 15 रुपये कॅशबॅक मिळेल.

दुसऱ्या वॉलेटवरही ऑफर

फ्रीचार्जवरून रिचार्ज करताना जिओच्या जुन्या ग्राहकांना JIO50 कोड टाकावा लागेल. यानंतर 50 रुपयांचं कॅशबॅक मिळेल. फ्लिपकार्टवरून रिचार्ज केलं तर जुन्या ग्राहकांना 30 रुपये आणि नव्या ग्राहकांना 75 रुपये मिळतील.

ऍक्सिस पे वरून रिचार्ज केल्यावर नव्या ग्राहकांना 100 रुपये आणि जुन्या ग्राहकांना 35 रुपये मिळतील.