२८ दिन वैधतेसोबत जीओचा सर्वात स्वस्त प्लान

Jio ने ४ जी सेवा लॉन्च केल्यानंतर इंटरनेटची स्पर्धा वाढीला लागली. अनेक कंपन्यांनी ४ जी सेवेला प्राधान्य देत आकर्षित योजना जाहीर केल्यात. जीओने पहिले सहा महिन्यांसाठी मोफत इंटरनेट सेवा देताना व्हाईस कॉल सेवाही दिली. आता तर जीओने सर्वात स्वस्त योजना आणली आहे. तीही २८ दिवसांसाठी.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 27, 2017, 08:48 PM IST
२८ दिन वैधतेसोबत जीओचा सर्वात स्वस्त प्लान title=

मुंबई : Jio ने ४ जी सेवा लॉन्च केल्यानंतर इंटरनेटची स्पर्धा वाढीला लागली. अनेक कंपन्यांनी ४ जी सेवेला प्राधान्य देत आकर्षित योजना जाहीर केल्यात. जीओने पहिले सहा महिन्यांसाठी मोफत इंटरनेट सेवा देताना व्हाईस कॉल सेवाही दिली. आता तर जीओने सर्वात स्वस्त योजना आणली आहे. तीही २८ दिवसांसाठी.

Jio च्या मोफत सेवेला विरोध होऊ लागल्यानंतर ट्रायने जीओला दणका देत मोफत सेवा बंद करण्याची सूचना दिली. त्यानंतर जीओने प्राईम मेंबरची योजना आणली. त्यानुसार ३०३ + ९९ सदस्य फी घेल्यानंतर पुन्हा चार महिने मोफत योजना सुरु केली. त्यानंतर व्होडाफोन, एअरटेल, आयडीया तसेच सरकाही दूरसंचार कंपनी बीएसएनएलनेही नवी योजना बाजारात आणली. त्यामुळे स्पर्धा अधिक वाढीला लागली.

३३९ रुपयांत ३ जीबी टाडा ७१ दिवसांसाठी BSNLने ग्राहकांना उपलब्ध करुन दिलाय. शिवाय मोफत कॉलची सुविधाही दिली आहे. आता जीओने आपले ग्राहक काय ठेवण्यासाठी १४९ रुपयांचा नवा प्लान आणला आहे. त्यानुसार जीओचे ग्राहक २८ दिवसांत ४ जी चा २ जीबी डाटा आणि नॉन प्राईम सदस्यांना १ जीबी डाटा मिळणार आहे. तसेच कॉलिंग फ्री राहणार आहे.