जिओ ग्राहकांसाठी २० जीबी फ्री डेटाची ऑफर

जेव्हापासून रिलायंस जिओ लॉन्च झाला आहे. तेव्हापासून ग्राहकांना नवीन नवीन ऑफर मिळत आहेत.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 12, 2017, 04:53 PM IST
जिओ ग्राहकांसाठी २० जीबी फ्री डेटाची ऑफर title=

नवी दिल्ली : जेव्हापासून रिलायंस जिओ लॉन्च झाला आहे. तेव्हापासून ग्राहकांना नवीन नवीन ऑफर मिळत आहेत.

जिओची ऑफर

जिओने आता झिओक्स मोबाईलसोबत करार केला आहे. या करारानुसार जिओ जिओक्स मोबाईलवर 20जीबी एक्स्ट्रा डेटा देणार आहे. या ऑफरसाठी  यूजरला ३०९ किंवा त्यापेक्षा अधिकचा रिचार्ज करावा लागेल. प्रत्येक रिचार्जवर त्याला ५ जीबी एक्स्ट्रा डेटा मिळेल. म्हणजेच ४ वेळा हा रिचार्ज करावा लागेल. जिओची ही ऑफर फक्त ३१ मार्च २०१८ पर्यंत राहणार आहे.

कशी मिळणार ऑफर

१. झिओक्स 4G फोनवर ३०९ रुपयांच्या रिचार्ज करा.
२. या रिचार्जवर ४ वेळा ५ जीबी डेटा मिळेल.
३. २० जीबी फ्री डेटासाठी ४ वेळा रिचार्ज करावा लागेल.
४. ३१ मार्च २०१८ ला ही ऑफर होणार बंद
५. यूजरच्या मोबाईलमध्ये अधिकचा डेटा माय जिओ अॅप वाउचर सेक्शनमध्ये ४८ तासांच्या आत जमा होईल.