Jio Down: जिओचं नेटवर्क काम करेना, इंटरनेट चालेना; तुम्हालाही येतेय का अडचण?

Jio Down: आउटेजची सर्वाधिक समस्या दिल्ली, लखनौ आणि मुंबईसारख्या शहरांमधून दिसून येत आहे.

Pravin Dabholkar | Updated: Sep 17, 2024, 01:28 PM IST
Jio Down: जिओचं नेटवर्क काम करेना, इंटरनेट चालेना; तुम्हालाही येतेय का अडचण? title=
जिओचं नेटवर्क काम करेना

Jio Down: तुम्ही Jio सिम वापरत असाल तर तुम्हाला मोबाईल वापरताना अडचणी यायला सुरुवात झाली असेल. कारण रिलायन्स जिओची सेवा देशभरात ठप्प झाली आहे.यामुळे देशभरातील लाखो यूजर्स त्रस्त झाले आहेत. जिओच्या नेटवर्कबद्दल तक्रारी केल्या जात आहेत. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास डाउनडिटेक्टरवर 10 हजारांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आमच्या फोनवर जिओ सिग्नल येत नाहीत, असे ट्वीटदेखील केले जात आहे. तर 20 टक्के लोक या समस्येमुळे इंटरनेट वापरू शकत नाहीत. आउटेजची सर्वाधिक समस्या दिल्ली, लखनौ आणि मुंबईसारख्या शहरांमधून दिसून येत आहे.

जिओ डाऊन ट्रेंडवर 

देशभरातील अनेक युजर्स जिओची सेवा बंद असल्याच्या तक्रारी करत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर Jio Down देखील ट्रेंड करत आहे. यानंतर काही युजर्स जिओ डाउनचे मीम्सही शेअर करत आहेत.

जिओ फायबर देखील काम करेना 

Jio च्या मोबाईल नेटवर्क व्यतिरिक्त, काही यूजर्सना Jio च्या ब्रॉडबँड सेवेवर म्हणजेच Jio Fiber वर इंटरनेट वापरण्यात समस्या येत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर हजारो यूजर्स याबद्दल माहिती देत ​​आहेत. बातमी लिहीपर्यंत कंपनीकडून आउटेजबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.