मुंबई : Reliance Jio 5G Mobile बद्दल टेलिकॉम क्षेत्रात एकच जोरदार चर्चा सुरु आहे. 5 जी स्मार्टफोनचे फीचर्सही लीक्स झाल्याचं म्हटलं जात आहे. रिलायन्सने गेल्या वर्षी सर्वसाधारण सभेत 4 जी सपोर्ट असणारा पहिला स्मार्टफोन Jio Phone Next लॉन्च केला होता. आता रिलायन्स सर्वसामांन्याना परवडेल अशा दरात 5जी स्मार्टफोन JioPhone 5G लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. (jio 5g smartphone price and featuresd specifications know about all thing)
या चर्चेमुळे सर्वसामांन्यांमध्ये JioPhone 5G केव्हा लॉन्च होणार, याबाबतची उत्सूकता लागून आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची येत्या 29 ऑगस्टला सर्वसाधारण सभा पार पडणार आहे. या सभेदरम्यान JioPhone 5G लॉन्च होणार असल्याचं म्हटलं जातंय. दुसऱ्या बाजूला मात्र या JioPhone 5G स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स लीक झाले आहे. याबाबत आपण जाणून घेऊयात.
JioPhone 5G मध्ये 4 GB रॅम, 32 इंटरनल स्टोरेज आणि स्नैपड्रैगन 480 चिपसेट असू शकतं, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. या स्मार्टफोनचं 6.5 इंच की एचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले असल्याचं सांगितलं जात आहे.
कॅमेराच्या बॅक पॅनलवर ड्युएल रिएर कॅमेरा सेटअप, 13 मेगापिक्सल प्रायमरी कॅमरा, 2 मेगापिक्सल इतरा मॅक्रो कॅमेरा सेंसर असू शकतो. तसेच सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल फ्रँट कॅमेरा सेंसर दिला जाऊ शकतो. हा स्मार्टफोनही ओएस या ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असणार आहे.
2 आणि 4 जीबी अशा 2 व्हेरिएंट्समध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध असेल, असंही सांगितलं जातंय. या स्मार्टफोनचा बेस वेरिएंट 12 हजारात उपलब्ध असेल, असं सांगितलं जातं.