मुंबई : यूट्यूबने २०१७ मधील सर्वात टॉपवर असलेल्या भारतातील १० व्हिडीओंमध्ये हा डान्स व्हिडीओ आहे. ज्या गाण्यावर हा डान्स करण्यात आला आहे, त्या गाण्याची भाषा मल्याळम असली, ती अनेकांना समजली नाही, मात्र या गाण्यावरील डान्स सर्वांना आवडला.
हा व्हिडीओ भारतात २०१७ साली २ नंबरवर राहिला. 'जिमक्की कम्मल' हे गाणं इंडियन स्कूल ऑफ कॉमर्सच्या विद्यार्थीनींनी सादर केलं आहे. या व्हिडीओला १९ कोटी ३ लाखपेक्षा जास्त वेळा पाहण्यात आलं आहे. या व्हिडीओतील डान्स हा शेरील जी काडावन यांनी टीचरने बसवला आहे.
या गाण्यात डाव्या बाजूला डान्स करताना शेरील दिसते. हे गाणं हिट झाल्यानंतर शेरीलच्या नावाने फेसबुकवर अनेक वेळा तिच्या नावाने फेक अकाऊंट बनवण्यात आलं होतं.