Jaguar New Logo: लक्झरी कारसाठी ओळखल्या जाणाऱ्या जॅग्वार कंपनीने त्यांचा लोगो बदलला आहे. अलीकडेच कंपनीने नव्या लोगोचे अनावरण केले आहे. 102 वर्ष जुनी असलेल्या या वाहन कंपनीने मंगळवारी ही घोषणा केली आहे. नवीन लोगो जारी केल्यानंतर नेटकऱ्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. टेस्लाचे मालक एलन मस्कनेदेखील या लोगोवरुन कंपनीला ट्रोल केले आहे.
जॅग्वार कंपनी त्यांच्या सीडान आणि महागड्या कारसाठी खूप प्रसिद्ध आहे. जगभरात जॅग्वार कारचे चाहते आहेत. आत्तापर्यंत कंपनीने जगभरात विविध प्रकारचे मॉडल जारी केले आहेत. आता कंपनी 2026 साली संपूर्णपणे इलेक्ट्रिक कार निर्माता म्हणून बाजारात उतरण्याची तयारी करत आहेत. त्यामुळंच कंपनीने त्यांचा आयकॉनिक लोगो बदलला आहे. जॅग्वार आता इलेक्ट्रिक कारवर फोकस करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
3 डिसेंबर रोजी मियामी आर्ट वीकमध्ये कंपनीने नवीन इलेक्ट्रिक कार कॉन्सेप्ट जगासमोर घेऊन येण्याच्या तयारीत आहे. त्यामुळंच नवीन लोगो जारी करणे हे देखील कंपनीने एका इलेक्ट्रिक कार म्हणून नवीन वर्चव्स स्थापन करण्याच्या उद्देशाने पहिले पाऊल असल्याचे म्हटलं जातं आहे. मात्र, इंटरनेट युजर्सना मात्र कंपनीचा नवीन लोगो फारसा आवडला नसल्याचे चित्र आहे.
Copy nothing. #Jaguar pic.twitter.com/BfVhc3l09B
— Jaguar (@Jaguar) November 19, 2024
जगातील प्रमुख लक्झरी इलेक्ट्रिक कार निर्माती कंपनी टेस्लाचे मालक एलन मस्क यांनी जॅग्वारच्या नवीन लोगोवर प्रतिक्रिया दिली आहे. एलन मस्क याने सोशल मीडिया नेटवर्किंग साइट Xवर म्हटलं आहे की, तुम्ही कारची विक्री करता का? यावर जॅग्वारच्या अधिकृत हँडलवरुन उत्तर देण्यात आले की, हो आम्ही तुम्हाला 2 डिसेंबर रोजी मियामी येथे एक कप चहाबरोबर सामील होण्याचे निमंत्रण देत आहोत.