अवघ्या काही सेकंदांत आऊट ऑफ स्टॉक झाला iPhone X

बुकिंगच्या पहिल्याच दिवशी अॅपलच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन Phone X ला ग्राहकांनी जबरदस्त प्रतिसाद दिल्याचं पहायला मिळत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 27, 2017, 06:07 PM IST
अवघ्या काही सेकंदांत आऊट ऑफ स्टॉक झाला iPhone X title=

नवी दिल्ली : बुकिंगच्या पहिल्याच दिवशी अॅपलच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन Phone X ला ग्राहकांनी जबरदस्त प्रतिसाद दिल्याचं पहायला मिळत आहे.

आयफोनची बुकिंग दुपारी १२.३१ वाजता सुरु करण्यात आळी आणि अवघ्या काही सेकंदांमध्येच हा फोन आऊट ऑफ स्टॉक झाला. फोनचं बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना फोनची डिलिव्हरी ३ नोव्हेंबरपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे.

कंपनीने आयफोन Phone X दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. ज्यामध्ये ६४ जीबी आणि २५६ जीबी फोनचा समावेश आहे. ६४ जीबी व्हेरीएंटची किंमत ८९ हजार रुपये आहे तर २५६ जीबी व्हेरीएंटची किंमत १ लाख २ हजार रुपये आहे.

अॅपलने आपल्या १०व्या वर्षपूर्तीनिमित्त iPhone Xच्या रुपात ग्राहकांना एक गिफ्ट दिलं आहे. १२ डिसेंबर रोजी iPhone 8 आणि iPhone 8 plus सोबत लॉन्च केला होता. फ्लिपकार्टने या फोन नो कॉस्ट EMI ची ऑफर सुरु केली होती. यामध्ये बुकिंग करणाऱ्यांना प्रत्येक महिन्याला ९,८८९ रुपयांच्या हफ्त्याने iPhone X खरेदी करता येईल.

iPhone X, iPhone X sold out, iPhone X specification, apple, apple iphone x
Image: Flipkart

यासोबतच फोन ३,०८६ रुपयांच्या स्टँडर्ड EMI वर खरेदी केला जाऊ शकतो. मात्र, यावर व्याज द्याव लागणार आहे. अॅक्सिस बँकेचं क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना ५ टक्क्यांचं अॅडिशनल डिस्काऊंट मिळणार आहे. फोनची पूढील बुकिंग सधी सुरु होणार आहे यासंदर्भात अॅपलने किंवा फ्लिपकार्टने कुठलीही माहिती दिलेली नाहीये.

हे आहेत खास फिचर्स...

वॉटर प्रूफ बॉडीसोबत सादर केलेल्या iPhone X मध्ये आयडी रिकग्निशन फिचर देण्यात आलं आहे. यामध्ये युजर आपल्या चेहऱ्याचा पासवर्ड बनवून फोन अनलॉक करु शकतो. ५.८ इंचाचा OLED डिस्प्ले असलेल्या फोनमध्ये ११२५X२४३६ पिक्सलचं रिझॉलूशन असणार आहे.