iPhone Discount : भन्नाट ऑफर ! केवळ 23,499 रूपयांमध्ये मिळतोय 41 हजारांचा iPhone

अॅपल फोनच्या खरेदीवर खूप मोठी सूट देतंय. चला जाणून घेऊया ही ऑफर नेमकी काय आहे.

Updated: Nov 18, 2022, 06:09 PM IST
iPhone Discount : भन्नाट ऑफर ! केवळ 23,499 रूपयांमध्ये मिळतोय 41 हजारांचा iPhone title=

Discount Offer : आयफोन 11 (iPhone 11) हे अॅपलचं (Apple) असं मॉडेल आहे ज्याची मागणी आता काही प्रमाणात कमी होताना दिसतेय. याचं कारण म्हणजे आयफोन 14 (iPhone 14) सिरीज लॉन्च झाल्यानंतरही अॅपल युझर्स आवडीने नव्या फोनची खरेदी करतायत. पॉवरफुल फीचर्स, उत्तम डिझाइन असलेला हा स्मार्टफोन प्रत्येक बाबतीत युझर्सच्या पसंतीस पडतोय. आम्ही आज तुम्हाला या फोनच्या एका डिस्काउंटची (Discount Offer) माहिती देणार आहोत. 

आयफोन 11 जुनी सिरीज असली तरीही त्याची किंमत मात्र अजूनही जास्तच आहे. मात्र तुम्ही जवळपास अर्ध्या किमतीत हा आयफोन खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट या अॅपल फोनच्या खरेदीवर खूप मोठी सूट देतंय. चला जाणून घेऊया ही ऑफर नेमकी काय आहे.

काय आहे आयफोनवर ऑफऱ

iphone11 वर Flipkart कडून जास्त सूट दिली जाणार नाहीये. हा प्रीमियम सेगमेंटचा स्मार्टफोन आहे, त्यामुळे तुम्हाला तो खरेदी करण्यासाठी ₹40,900 खर्च करावेच लागणार आहेत. याची लिस्टेड किंमत कमी आहे कारण त्याची मूळ किंमत ₹ 43,990 आहे. या किमतीवर 6 टक्के सूट दिली जातेय. त्यानंतर लिस्टेड किंमतीची रक्कम कमी होते. 

जर तुम्ही कोणत्याही ऑफरशिवाय iPhone 11 खरेदी केला तर तुम्हाला त्यासाठी ₹40,999 इतके रूपये भरावेच लागणार आहेत. जर तुम्ही त्यावर एक्सचेंज ऑफरचा फायदा घेतला तर लिस्टेड किंमतीतून ₹ 17,500 कमी केले जाणार आहेत. हीच किंमत एक्सचेंज बोनस म्हणून मिळणार आहे.

एक्सचेंज ऑफरची रक्कम ओरिजनल किमतीपेक्षा कमी झाल्यावर, ग्राहकांना या iPhone मॉडेलसाठी ₹23,499 पैसे द्यावे लागतील. ही रक्कम मूळ किंमतीच्या जवळपास निम्मी आहे. या डिस्काऊंटचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला थोडी घाई करावी लागणार आहे. कारण ही ऑफर फक्त थोड्या काळासाठी ठेवण्यात आली आहे.