Fact Check! खरंच iPhone 13 Pro Max फक्त 10 हजारांमध्ये मिळतोय का?

लाखोंचा फोन अवघ्या 10 हजारांमध्ये कसा काय मिळतोय?

Updated: Oct 1, 2022, 01:02 AM IST
Fact Check!  खरंच iPhone 13 Pro Max फक्त 10 हजारांमध्ये मिळतोय का? title=

iPhone At Affordable Price : प्रत्येकाला iPhone घ्यायचा असतो मात्र बजेटमुळे कित्येकवेळा तो घेणं अनेकांना परवडत नाही. आताच बाजारात आलेल्या 13 प्रो मॅक्स (Apple iPhone 13 Pro Max) फोन खरेदी करायचा असेल तर तुमचं बजेट 100000 पेक्षा जास्त हवं. अशातच एका ठिकाणी लाखांचा फोन अवघ्या 10 हजारांमध्ये मिळत आहे. तुम्हालाही विश्वास बसणार नाही पण नक्की खरंच इतक्या कमी किमतीमध्ये iphone13 मिळतोय का जाणून घ्या. (Apple iPhone 13 Pro Max in ten Thosand)

भारतातील आयफोनच्या सर्वात स्वस्त मॉडेलबद्दल बोलायचं झालं तर, त्याची किंमत 49 हजार आहे.  iPhone SE 2022 जो भारतात या वर्षी लॉन्च झाला होता. हे आयफोनचे सर्वात एंट्री लेव्हल मॉडेल आहे. नुकतेच आयफोन 14 सीरीज बाजारात लॉन्च करण्यात आली आहे आणि त्याची विक्री देखील सुरू झाली आहे. 

iphone 13 Pro Max फेसबुकच्या मार्केटप्लेसवर (Facebook Marketplace) विकला जात आहे. मार्केटप्लेस असं माध्यम आहे जिथं विक्रेते त्यांची उत्पादने ऑनलाईन पद्धतीने विकू शकतात. मात्र iphone जर इतक्या कमी किमतीमध्ये  विकला जात असेल तर हा काही आश्चर्यापेक्षा कमी नाही. तुम्हीही या ऑफरला भूलले असाल तर थोडं थांबा, नाहीतर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.

तुम्ही जर हे बनावट मॉडेल घेतलंत तर तुम्हाला बनावट आयफोन मॉडेल देतात. फेसबुक मार्केटप्लेसवरचे मॉडेल हे बनावट असतात, तुम्हाला अँड्रॉइड फोन दिले जातात, आयफोन हा IOS प्लॅटफॉर्मवर चालतो. तुमच्या फोनचा लूक हा आयफोनच्या मॉडेलसारखा दिसतो पण तेव्हा त्यांचा कॅमेरा, डिस्प्ले आणि बॅटरी बनावट असते. त्यामुळे तुम्ही असा फोन ऑनलाईन मागवत असाल तर टाळा.