Fake SMS: आजकाल, एक फेक एसएमएस सगळीकडे फिरत आहे. ज्यात तुम्हाला इंडिया पोस्टच्या नावाने तुमचा पत्ता अपडेट करायला सांगितला जातो आहे. पण हा मेसेज पूर्णपणे खोटा असून तुम्ही याकडे लक्ष देऊ नका, असे PIB Fact Check सांगितले आहे. PIB Fact Checkने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा बनावट संदेश असल्याची पुष्टी केली आहे आणि सगळ्यांनी अशा प्रकारांपासून सावध रहावे असा इशाराही दिला आहे.
PIB Fact Checkने एक्सवर पोस्ट करत त्याने लिहिले, 'सावध राहा! फसवणूक करणारे लोकं डिलिव्हरीमध्ये अडचणीचे कारण पुढे करत भारतीय डाकच्या ग्राहकांची फसवणूक करत आहेत. तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती कोणत्याही लिंकवर शेअर करू नका. तुम्हाला कोणताही संशयास्पद कॉल, मेसेज किंवा ईमेल आल्यास त्याची त्वरित चक्षु पोर्टलवर तक्रार करा.'
नमस्कार इंडिया पोस्ट ग्राहक, तुमचे पॅकेज डिलेव्हर करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु आम्ही ते डिलेव्हर करण्यात अयशस्वी झालो. अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या ग्राहक सेवा 1800 266 6868 वर संपर्क साधा किंवा या लिंकवर क्लिक करून तुमची डिलेव्हरी माहिती अपडेट करा: https://bit.ly/4aVxIOs. माहिती अपडेट केल्यानंतर, आम्ही 24 तासांच्या आत पॅकेज पुन्हा डिलेव्हर करण्याचा प्रयत्न करू. इंडिया पोस्ट निवडल्याबद्दल धन्यवाद.
ईमेल: Info@indiapost.gov.in मी फोन: +91 1234567890 I Fac: +91 11 4160565
Scam Alert! Fraudsters are targeting India Post customers, claiming delivery issues. Don’t share any personal details over any link. Stay vigilant and report suspicious calls, messages, or emails immediately at the Chakshu Portal: https://t.co/tXsFXeXrsD pic.twitter.com/uZkMSWSzrY
— India Post (@IndiaPostOffice) September 16, 2024
जर तुम्हाला अचानक एखाद्या अनोळखी नंबरवरून मेसेज आला तर सावधगिरी बाळगा, विशेषतः जर तो तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारत असेल किंवा कोणत्या लिंकवर क्लिक करण्यास सांगत असेल, तर अशा कोणत्याही मेसेजला प्रत्युत्तर देण्यापूर्वी हा मेसेज पाठवणाऱ्याची ओळख पडताळा.
टायपिंग आणि व्याकरणा संबंधीच्या चुका किंवा विचित्र भाषेकडे लक्ष द्या. असे मेसेज फसवे असल्याची ही चिन्हे असू शकतात. अनोळखी नंबरवरून आलेल्या मेसेजमध्ये कोणती लिंक असल्यास त्यावर कधीही क्लिक करू नका. कारण या लिंक तुम्हाला चूकीच्या वेबसाइटवर घेऊन जाऊ शकतात. या वेबसाइट तुमची वैयक्तिक माहिती चोरण्यासाठीच डिझाइन केलेल्या असतात.
तुमची वैयक्तिक माहिती कधीही एसएमएसद्वारे शेअर करू नका. तुमचे बँक डिटेल्स, क्रेडिट कार्ड नंबर किंवा पासवर्ड आणि यासारखी महत्त्वाची माहिती शेअर केल्यास त्याचा चूकीचा वापर होऊ शकतो. अधिकृत कंपन्या तुमच्याकडून ही माहिती कधीही एसएमएसद्वारे मागणार नाहीत. तुम्हाला कोणताही संशयास्पद मेसेज मिळाल्यास, तुमच्या मोबाइल सेवा प्रदात्याला (mobile service provider) आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्याची तक्रार करा.
तुमच्या सगळ्या ऑनलाइन अकाउंटसाठी मजबूत आणि वेगवेगळे पासवर्ड तयार करा. लक्षात ठेवा एकापेक्षा जास्त खात्यांसाठी समान पासवर्ड वापरू नका. शक्य झाल्यास डबल सिक्युरिटीसाठी
तुमच्या ऑनलाइन अकाउंटवर two factor authentication सुरू करा.