Disney+ Hotstar Down: भारत-ऑस्ट्रेलिया सामना सुरू असताना हॉटस्टारची सेवा बंद, नेटकऱ्यांचा बोभाटा!

Disney+ Hotstar Down: लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म Disney + Hotstar ची सेवा ठप्प झाली आहे. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना सुरू असतानाच अनेकांचं लाईव्ह स्ट्रिमिंग बंद पडलं.

Updated: Feb 17, 2023, 03:12 PM IST
Disney+ Hotstar Down: भारत-ऑस्ट्रेलिया सामना सुरू असताना हॉटस्टारची सेवा बंद, नेटकऱ्यांचा बोभाटा! title=
Hotstar Down

Disney+ Hotstar Down: एकीकडे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना सुरू असताना, OTT आणि लाईव्ह स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Disney+ Hotstar ची सेवा डाऊन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय. नेटकऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बोभाटा केल्याचं पहायला मिळतंय. (ind vs aus live streaming disney hotstar down hotstar outage  App and website latest tech news)

सोशल मीडियावर अनेक यूजर्सनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. अॅप (Hotstar APP) वापरत असताना यूजर्सना अडचणी येत असल्याचं पहायला मिळतंय. युजर्सनी ट्विटरवर लॉगिन (Hotstar Login) न होण्याचं काही स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांनी संताप देखील व्यक्त केलाय.

मोबाईल, लॅपटॉप त्याचबरोबर टीव्हीवर Disney+ Hotstar अॅक्सॅस करू शकत नाहीत. गेल्या तासाभरापासून प्लॅटफॉर्मची सेवा बंद असल्याचं पहायला मिळतंय. हॉटस्टारची (Hotstar Error) वेबसाइट hotstar.com देखील डाऊन असल्याचं दिसतंय.  हॉटस्टार डाऊन झाल्याने ट्वीटरवर #HotstarDown हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

आणखी वाचा  - Sundar Pichai यांचे नवे आदेश, 'कर्मचाऱ्यांनो.. 2 ते 4 तास Bard सोबत घालवा'

दरम्यान,  Ind VS Aus सामना सुरू असतानाच ही सेवा ठप्प (disney hotstar down) झाल्यानं यूजर्सचा पारा ऐन दुपारी चढल्याचं पहायला मिळतंय. त्यावर अद्याप हॉटस्टारकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. अनेक क्रिकेट मॅचचं प्रक्षेपण हॉटस्टारवरून केलं जातं. आयपीएल आणि वर्ल्ड कपसाठी प्रेक्षकांची पहिली पसंती हॉटस्टारला असले.