मुंबई : गेल्या काही वर्षांत स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यांमध्ये अनेक पटीने सुधारणा झाली आहे. हे 2021 आहे आणि बहुतेक अँड्रॉइड स्मार्टफोन आज किमान तीन कॅमेरा सेन्सरसह येतात आणि ही संख्या जास्तीत जास्त पाच लेन्सपर्यंत जाते. अर्थातच फोटोग्राफीसाठी तंत्रज्ञान खूपच विकसित होताना दिसत आहे. उदाहरण म्हणजे Nokia 9 PureView हे मॉडेल भारतात 2019 ला दुसऱ्यांदा लॉन्च केले गेले. हे पॅक्ड पेंटा-रियर कॅमेरा सिस्टिमसोबत आले आहे.
सध्याच्या काळात सर्वजण आपल्या दैनंदिन जीवनात स्मार्टफोनचा वापर जास्तीत जास्त करतात. अनेक कामांसाठी ते स्मार्टफोनवर अवलंबून असतात. तुम्ही कुठे फिरायला गेले तर नक्कीच फोटो काढण्यासाठी तुम्ही आपल्या जवळील स्मार्टफोनचा वापर करता. परंतु जर तुम्ही फोटोग्राफीमध्ये कच्चे असाल तर या पाच टिप्स आवर्जून वाचा.
1. शूटिंगच्याआधी आपल्या फोनचा लेन्स स्वच्छ करुन घ्या. यामुळे जो ब्लर इफेक्ट तुमच्या फोनला येतो तो येणार नाही. लेन्स स्वच्छ करण्यासाठी एका लहान कॉटनच्या कपड्याचा वापर करा. बऱ्याचदा तुम्ही लेन्स स्वच्छ करताना आपल्या टी-शर्टचा वापर करता. परंतु टी-शर्टने लेन्स स्वच्छ करणे टाळा, यामुळे तुमच्या लेन्सवर स्क्रॅच पडू शकतात.
2. उत्तम शूट करायचे असल्यास एक्सपोजरचा बॅलेन्स करण्यासाठी स्क्रिनच्या सर्वात ब्राईट भागावर टॅप करा. यामुळे तुम्हाला उत्तम रिझल्ट मिळेल.
3. फोटो काढण्यासाठी अपोजिट बॅकग्राऊंडचा वापर करा. यामुळे तुमचे फोटो आकर्षित वाटतील. जर तुमच्याकडे चांगले बॅकग्राऊंड नसेल तर स्वच्छ निळ्या आकाशाच्या उपयोग करा. यामुळे फोटोला थ्रीडी इफेक्ट येतो.
4. जर तुमच्याकडे फोटो काढण्यासाठी एखादी वस्तू आहे. तर त्याला हायलाईट करण्यासाठी पोर्ट्रेट मोडचा वापर करा. एखादं सुंदर फूल, प्राणी किंवा कुठल्या ऑब्जेक्टला कॅप्चर करत असाल तर पोर्ट्रेट मोडचा वापर करा. यामुळे ऑब्जेक्ट हायलाईट होऊन मागचे बॅकग्राऊंड ब्लर होते.
पोर्ट्रेट मोडचा वापर केल्यास फोटो खूप आकर्षित वाटतो. सध्याचा स्मार्टफोनमध्ये बॅक आणि फ्रंट कॅमेरामध्ये पोर्ट्रेट मोडचे फिचर इनबिल्ड दिले जाते. पोर्ट्रेट मोडमधील परिणाम अनेकदा तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात. तुमच्याकडे आधीपासून नसेल तर वापरून पहा.
5. तुम्हाला बाहेरचे फोटो क्लिक करायचे असेल तर चांगल्या सुर्यप्रकाशात फोटो काढावे. घराच्या आत उत्तम फोटो काढण्यासाठी चांगले परिणाम येण्यासाठी सुद्धा तुम्ही घरातील लाईटचा वापर करु शकता.