Hyundai ची Venue N Line ही गाडी देणार अपघाताचा पुरावा! कसं ते जाणून घ्या

रस्ते अपघातात दरवर्षी हजारो लोकांना जीव गमवावा लागतो. काही अपघातांचा पुरावा देखील हाती लागत नाही. नेमकी कोणाची चूक असावी, याबाबत चर्चांना उधाण येतं. मात्र ह्युंदाई कंपनीची व्हेन्यू एन लाईन (Hyundai Venue N Line) अपघाताचा पुरावा देण्यास सक्षम आहे. 

Updated: Nov 16, 2022, 05:52 PM IST
Hyundai ची Venue N Line ही गाडी देणार अपघाताचा पुरावा! कसं ते जाणून घ्या title=

Hyundai Venue N Line Features: देशात गेल्या काही वर्षात रस्ते अपघात रोखण्यासाठी अनेक नियमांची अंमलबजावणी केली गेली आहे. मात्र असं असलं तरी रस्ते अपघात कमी झालेले नाही. रस्ते अपघातात दरवर्षी हजारो लोकांना जीव गमवावा लागतो. काही अपघातांचा पुरावा देखील हाती लागत नाही. नेमकी कोणाची चूक असावी, याबाबत चर्चांना उधाण येतं. मात्र ह्युंदाई कंपनीची व्हेन्यू एन लाईन (Hyundai Venue N Line) अपघाताचा पुरावा देण्यास सक्षम आहे. ह्युंदाईने ऑगस्ट महिन्यात वेन्यू एसयूव्हीची स्पोर्ट वर्जन लाँच केलं होतं. या गाडीमध्ये डॅशकॅम ड्युअल कॅमेरा (Dash Cam Dual Camera) आहे. त्यामुळे गाडीच्या आतील आणि बाहेरील दोन्ही जागांची रेकॉर्डिंग होणार आहे. याद्वारे ड्रायव्हिग रेकॉर्डिंग, इव्हेंट रेकॉर्डिंग, वेकेशन रेकॉर्डिंग आणि पार्किंग रेकॉर्डिंग केली जाऊ शकते. गाडीतील डॅश कॅमुळे अपघाताची स्थिती कळणार आहे. त्यामुळे पुरावा म्हणून त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. 

कारची इतर सुरक्षा फीचर

फन ड्रायव्हिंग एसयूव्ही अनुभव घेणाऱ्या लोकांसाठी हे मॉडेल आहे. सुरक्षेच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ह्युंदाई व्हेन्यू एन लाईनला ड्युअल एअरबॅग्ज, ब्रेक असिस्ट सिस्टम, EBD सह ABS, हिल असिस्ट कंट्रोल, व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल, ISOFIX चाइल्ड सीट अँकर, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, 4 डिस्क ब्रेक्स, पार्किंग असिस्ट सेन्सर आणि कॅमेरा इ. फीचर्स देण्यात आले आहेत. या गाडीची किंमत 12.16 लाख रुपयांपासून सुरु होते.

बातमी वाचा- Tips And Tricks: गाडी चालवताना गाडीचा ब्रेक फेल झालं तर काय कराल? जाणून घ्या इमर्जंसी टिप्स

डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर यात स्टँडर्ड वेन्यूच्या तुलनेत गियर नॉब, सेंटर कन्सोल आणि डॅशबोर्डवर लाल इन्सर्ट आहे. यात वायरलेस ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी, बोस ऑडिओ सिस्टम, ब्लूलिंक कनेक्टेड कार टेक, इलेक्ट्रिक सनरूफसह 8.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिले आहे. ह्युंदाई व्हेन्यू एन लाईनची थेट स्पर्धा टाटा नेक्सन, मारुती ब्रेझा आणि किया सोनेटसारख्या कारशी आहे.