पेट्रोल न टाकता ५०० किलोमीटर चालणारी Hyundai ची SUV कार

साऊथ कोरियाची कार निर्माता कंपनी ह्युंदाई भारतीय बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही कार लॉन्च करणार आहे. 

Updated: Nov 19, 2018, 05:44 PM IST
पेट्रोल न टाकता ५०० किलोमीटर चालणारी Hyundai ची SUV कार title=

मुंबई : साऊथ कोरियाची कार निर्माता कंपनी ह्युंदाई भारतीय बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही कार लॉन्च करणार आहे. या कार पहिल्यांदा जिनेव्हा मोटर शोमध्ये सर्वांना दिसली. ह्युंदाई कोना कंपनीची ही एसयूव्ही कार पहिल्यांदा भारतात लॉन्च होणार आहे. या आधी या कारची झलक ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये पाहायला मिळाली होती. ही कार २०१९ मध्ये लॉन्च होईल असं म्हटलं जात आहे.

बिना पेट्रोलची ४८२ किमी धावणार

ह्युंदाई कोना एसयूव्ही पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजारात विकली जात आहे. या कारच्या इलेक्ट्रिक मोटारची पावर १३१ बीएसची आहे. हे इंजीन न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करतं. 

कंपनीने दावा केली आहे की, फूल चार्ज केल्यावर ही गाडी ३०० माईल्स म्हणजेच ४८२ किमी पर्यंत चालते. या कारची किंमत अजून अधिकृतरित्या समजली नसली, तरी भारतीय बाजारात ही कार १३ ते १८ लाखाच्या दरम्यान येण्याची शक्यता आहे.

कारचं डिझाईन कसं आहे...

या कारमध्ये १७ इंचाचा अलॉय व्हिल, डिजिटल डॅशबोर्ड आहे, ७ इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, हिटेड सिट्स, अडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल, लेन सेंटरिंग सिस्टम, रिअर क्रॉस ट्रॅफिक कॅमेरा अलर्ट आणि ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग आणि दमदार फीचर्स आहेत.

१ तासात ८० टक्के चार्जिंग होणार

ह्युंदाईनं असं म्हटलं की, ही गाडी १ तासात ८० टक्के चार्ज होईल. यासाठी १०० किलो वॅट डीसीचं फास्ट चार्जर लावावं लागेल. नॉर्मल एसी पॉईंटला ही गाडी ६ तास चालू शकते.

स्पीड असा असेल

इलेक्ट्रिक एसयूव्ही कार कोना 9.3 सेकंदाला ० ते १०० किमी प्रति तास धावण्यास सक्षम आहे. कारचा टॉपस्पीड १६७ किमी प्रतितास आहे. या कारला एअरोडायनॅमिकली डिझाईन करण्यात आलं आहे. ही कार भारतात सीकेटी रूटने आणण्यात येईल. यानंतर चेन्नईच्या एका कारखान्यात तिला असेंबल करण्यात येईल.

पहिल्यांदा या शहरांमध्ये दिसेल ही कार

ह्युंदाई २०१० पर्यंत भारतात ८ कार लॉन्च करणार आहे. यात कोनाचा देखील समावेश आहे. ह्युंदाई कोना भारतातील ऑटो बाजारात काही निवडक ठिकाणी कार विकणार आहे. यात मुंबईसारख्या महानगराचा समावेश असणार आहे. पण यानंतर वाढत्या स्पर्धेमुळे मोठ्या शहरांमध्येही कार उपलब्ध होणार आहे.