Hyundai कंपनीच्या वेगवेगळ्या कारच्या किंमतीत मोठी वाढ

कार्सवर जीएसटी लागू करण्यात आल्यानंतर शुक्रवारी देशातील दुसरी सर्वात मोठी कार निर्माती कंपनी ह्यूंदाई मोटार लिमिटेडने त्यांच्या वेगवेगळ्य कार्सच्या किंमतीत मोठी वाढत केली आहे.

Updated: Sep 15, 2017, 11:34 PM IST
Hyundai कंपनीच्या वेगवेगळ्या कारच्या किंमतीत मोठी वाढ title=

नवी दिल्ली : कार्सवर जीएसटी लागू करण्यात आल्यानंतर शुक्रवारी देशातील दुसरी सर्वात मोठी कार निर्माती कंपनी ह्यूंदाई मोटार लिमिटेडने त्यांच्या वेगवेगळ्य कार्सच्या किंमतीत मोठी वाढत केली आहे.

या कंपनी त्यांच्या वेगवेगळ्या कार्सच्या किंमतील ८४ हजार ८६७ रूपयांपर्यंतची वाढ केलीये. 

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कार्सच्या किंमतीत २ ते ५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. आणि ही वाढ ११ सप्टेंबरपासून लागू होईल. कंपनीने त्यांच्या हॅचबॅक कार एलीट आय२० च्या किंमतीत १२ हजार ५४७ रूपये, व्हर्नामध्ये २८ हजार ०९० रूपये आणि क्रेटामध्ये २० हजार ९०० रूपयांपासून ते ५५ हजार ३७५ रूपयांची वाढ केली आहे. 

तर कंपनीने त्यांच्या एलांट्रा कारच्या किंमतीत ५० हजार ३१२ ते ७५ हजार ९९१ रूपयांपर्यंत आणि टस्कन कारच्या किंमतीत ६४ हजार ८२८ ते ८४ हजार ८६७ रूपयांपर्यंत वाढ केली आहे.