नवी दिल्ली : ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये होंडा कंपनीने सर्वात मोठा खुलासा करत अॅक्टीव्हा ५ जी स्कूटवरून पडदा उठवला आहे. या नव्या स्कूटरमध्ये नवीन फीचर्स आहेत आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात ही स्कूटर बाजारात लॉन्च केली जाईल.
डिझाइनबाबत सांगायचं तर होंडा अॅक्टीव्हा ५जी ही स्कूटर लॉन्च करून कंपनी आपला बाजारातील बेस मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहे. लोकप्रिय स्कूटर ब्रॅण्डची ओळख कायम राखत कंपनीने नव्या फीचर्ससह ही स्कूटर सादर केली आहे. स्कूटरच्या पुढील बाजूस एक नवीन एलईडी लॅम्प दिलाय. हा लॅम्प दिवसा इंटीग्रेटेड एलईडीसोबत पेटत राहतो. त्यासोबतच क्रोमची गार्निशिंगही केली आहे.
स्कूटरमध्ये नेहमीप्रमाणे ‘अॅक्टीव्हा फॅशन’ला कायम ठेवत एक ऑल मेटल बॉडी दिली गेलीये. बॉडीमध्ये ३डी प्रिंटही आहे. अॅक्टीव्हा ५जीमध्ये अॅनालॉग-डिजिटल फंक्शनसोबत एक नवीन डिझाइन असलेलं इन्स्ट्रूमेंट क्लस्टर, एक मोबाईल चार्जिंग सॉकेट, एक रिअर हुक, मल्टीफंक्शनचं स्लॉटसारखे फीचर्स दिले आहेत. स्कूटरमध्ये सीटच्या खाली स्टोरेज कम्पार्टमेंट, एलईडी हेड लॅम्प आणि टेल लॅम्पही आहे.
अॅक्टीव्हाने ११० सीसी, फोर स्ट्रोक असलेल्या फॅन-कूल पेट्रोल इंजिनला कायम ठेवलं आहे. यात होंडा इंजिनचं तंत्र देण्यात आलंय. ही मोटार ८ बीएचपीची पावर जनरेट करते आणि हे ऑटोमॅटीक सीवीटी ट्रान्समिशनसोबत येतं.
अॅक्टीव्हा ५ जीमध्ये सीटच्या खाली १८ लिटरची स्टोरेज टॅंक, कॉम्बी ब्रेकिंग सिस्टमसोबत दोन्ही चाकांमध्ये ड्रम ब्रेक, ट्यूबलेस टायर, स्टील रिम दिलं आहे. स्कूटरच्या किंमतीचा खुलासा करण्यात येणार आहे.