मुंबई : आजच्या काळात आपल्याला काहीही जाणून घ्यायचे असेल, तर आपण प्रथम Google वर जातो आणि इंटरनेटच्या मदतीने ते शोधण्याचा प्रयत्न करतो. गुगल देखील आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो. त्यामुळे लोकांना देखील हे बऱ्याचदा बोलताना पाहिलं असेल की, 'कोणतीही अडचण आली तर गुगुल बाबा आहे ना.' रस्त्यांपासून ते, एखादं ठिकाण आणि कोर्टांच्या नियमांपासून ते रोजच्या जिवनातील वस्तुंपर्यंत आपल्याला सगळं गुगलवरती मिळतं. ज्यामुळे आपण देखील अगदी छोट्या गोष्टी गुगलवरती शेअर करतो. परंतु तुम्हाला माहितीय का की, तुम्ही सगळ्याच गोष्टी गुगलवर सर्च नाही करु शकत.
हो हे खरं आहे. अशा काही गोष्टी आहेत. ज्या तुम्ही गुगलवरती सर्च केलात, तर ते तुम्हाला महागात पडू शकतं. एवढंच काय तर, तुम्हाला जेलमध्ये जावं लागू शकतं. चला तर मग जाणून घेऊयात की, आपण कोणत्या गोष्टी गुगलवर शोधल्या नाही पाहिजे.
असे बरेच लोक असतात, जे गुगलवरती पॉर्न साईट पाहातात. परंतु यामध्ये कधीही चाइल्ड पॉर्न संबंधीत गोष्टी तुम्ही सर्च करु नका. कारण भारतात, याबाबत एक कायदा आहे. POCSO कायदा 2012 च्या कलम 14 नुसार, चाइल्ड पॉर्न पाहणे, बनवणे आणि आपल्याकडे ठेवणे हा कायदेशीर गुन्हा आहे.
यापैकी कोणत्याही परिस्थितीत तुम्ही पकडले गेल्यास, तुमच्यावर योग्य ती कारवाई केली जाऊ शकते. या गुन्ह्यासाठी तुम्हाला ५ ते ७ वर्षे तुरुंगवास भोगावा लागेल अशी तरतूद आहे. त्यामुळे Google वर हे कधीही करू नका.
बॉम्ब कसा बनवायचा हे गुगलवर कधीही शोधू नका. जर तुम्ही असे केले, तर सर्वप्रथम तुम्ही सुरक्षा एजन्सींच्या रडारवर याल आणि मग ते तुमच्यावर योग्य कारवाई देखील करू शकता. त्यामुळे हे कधीही सर्च करु नका.
तुम्ही गर्भपाताबद्दल गुगलवर कधीही सर्च करू नये, कारण भारतात जर तुम्ही डॉक्टरांच्या योग्य परवानगीशिवाय गर्भपात केला, तर ते बेकायदेशीर आहे. याशिवाय गुगलवर तुम्हाला अनेक मार्ग सापडतील, ज्याद्वारे तुम्ही अडचणीत येऊ शकता. त्यामुळे गुगलवर हे सर्च करू नका.
अनेक वेळा लोक गुगलवर जाऊन ऑफर्स तपासतात आणि ते फसतात. या ऑफर अनेक बनावट वेबसाइट्सद्वारे देखील दिल्या जातात, ज्या तुमच्याकडून तुमची बँकिंग माहिती घेऊन तुमची फसवणूक करण्याचे काम करतात. त्यामुळे गुगलवर ऑफर्सबद्दल कधीही सर्च करू नका.