Play Storeवरील अ‍ॅप्सना Google ने हटवलं... तुमच्या फोनमध्ये देखील हे असतील तर लगेच हटवा

अ‍ॅप्समध्ये कस्टम कीबोर्ड, QR कोड स्कॅनर, व्हिडीओ आणि फोटो एडिटर, स्पॅम कॉल ब्लॉकर्स, कॅमेरा फिल्टर यांसारख्या श्रेणींमध्ये अ‍ॅप्स समाविष्ट आहेत.

Updated: Oct 31, 2021, 09:22 PM IST
Play Storeवरील अ‍ॅप्सना Google ने हटवलं... तुमच्या फोनमध्ये देखील हे असतील तर लगेच हटवा title=

मुंबई : Android स्मार्टफोन वापरकर्ते त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा हवा तो ऍप वापरण्यासाठी अनेकदा Google Playstore किंवा अज्ञात स्त्रोतांमधून अ‍ॅप डाउनलोड करतात. तुमच्या फोनवर खूप अनेक अ‍ॅप्स असतील, तर एकदा तुमच्या फोनची अ‍ॅप्स लिस्ट तपासा. खरेतर Google Playstore वरून 150 हून अधिक अ‍ॅप्स काढून टाकण्यात आले आहेत, जे सामान्य वापरकर्त्यासाठी धोकादायक होते.

Google Play Store वरील 150 अ‍ॅप्स UltimaSMS मोहिमेत समाविष्ट करण्यात आले होते. याचा वापर फसवणूक करण्यासाठी केला जात होता. प्रीमियम एसएमएस सेवेत साइन इन करण्यासाठी वापरकर्त्यांना प्रलोभन देण्यासाठी अ‍ॅप्सचा वापर केला गेला, त्यानंतर वापरकर्त्यांची आवश्यक माहिती चोरली गेली. तुमच्या स्मार्टफोनमध्येही अशा अ‍ॅप्सचा समावेश असेल तर ते लगेच डिलीट करा.

Avast Antivirusने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये माहिती दिली आहे की, हे अ‍ॅप्स 10 दशलक्षाहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहेत. हे सर्व अ‍ॅप्स त्याच पद्धतीने काम करत होते. UltimaSMS मोहिमेचा भाग असलेले हे अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठीही उपलब्ध होते. जेव्हा वापरकर्त्यांनी हे अ‍ॅप्स Google Play Store वरून डाउनलोड केले, तेव्हा अ‍ॅप्स वापरकर्त्याचे स्थान, IMEI आणि फोन नंबर ट्रॅक करत होते, ज्याचा वापर ते गुन्हेगारीसाठी करु शकतात.

घोटाळे अंमलात आणण्यासाठी वापरल्या जाणार्‍या अ‍ॅप्समध्ये कस्टम कीबोर्ड, QR कोड स्कॅनर, व्हिडीओ आणि फोटो एडिटर, स्पॅम कॉल ब्लॉकर्स, कॅमेरा फिल्टर यांसारख्या श्रेणींमध्ये अ‍ॅप्स समाविष्ट आहेत. हे अ‍ॅप्स आयएमईआय नंबर, लोकेशन, फोनचा क्रमांक मिळाल्यानंतर स्कॅमर कोणत्या देशात आणि कोणत्या भाषेत घोटाळा करायचा हे ठरवतात.

तुम्ही तुमच्या फोनमध्ये उपस्थित असलेले सर्व अ‍ॅप्स पाहू शकत नसाल तर तुम्ही यासाठी स्मार्टफोनच्या सेटिंग्जचा अवलंब करू शकता. स्मार्टफोन उघडा आणि त्यामध्ये असलेल्या सेटिंग्जवर जा. तेथे तुम्हाला अ‍ॅप्स आणि नोटिफिकेशन्सचा पर्याय मिळेल, ज्यामध्ये तुम्ही सर्व उपलब्ध अ‍ॅप्स पाहू शकता किंवा तुम्ही यासाठी गुगल प्लेस्टोअरचीही मदत घेऊ शकता. असे अ‍ॅप्स लगेच तुमच्या फोनमधून काढून टाका.