मुंबई: अनेकदा आपण डेटा जास्त जाईल म्हणून रोज बॅकअप करणं टाळतो किंवा काहीवेळा आपल्याकडून राहून जातं. गुगलचं बॅकअप न घेणाऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या अनेक सेवांपैकी आता गुगल एक सेवा बंद करणार आहे. त्यामुळे बॅकअप घेतलं नसेल तर आपलं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
गुगल आपली लवकरच एक सेवा लवकरच बंद करणार आहे. गंभीर बाब म्हणजे Google आता या सेवेचा सर्व डेटा गुगलकडून हटवण्यात येणार आहे. म्हणजेच, या सेवेत असलेली कोणतीही माहिती पुन्हा सापडणार नाही. आपला डेटा हटविण्यापूर्वी तो बॅकअप केला नसेल तर आजच करून घेणं तुमच्यासाठी फायद्याचं आहे.
zeenews.india.com च्या मते, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गुगलची प्ले संगीत सेवा बंद करण्यात आली आहे. कंपनीने वापरकर्त्यांना ही माहिती दिली होती की आता ही सेवा उपलब्ध होणार नाही. 24 फेब्रवारीपर्यंत जर आपण आपल्या गाण्यांचा बॅकअप घेतला नाही तर त्यावरील सर्व माहिती निघून जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुगलने नुकतीच माहिती दिली आहे की आता ही सेवा सर्व्हरवरून देखील हटविली जाईल. त्यामुळे सर्व युझर्सनी 24 फेब्रुवारी 2021 पूर्वी प्ले म्युझिकमधून त्यांचा डेटा काढून टाकावा. त्यानंतर, कंपनी ही सर्व्हरवरून ही सेवा देखील हटवण्यात येणार आहे. त्यामुळे युझर्सला आता हा डेटा पुन्हा कधीही मिळू शकणार नाही.
प्ले मुझिक अॅपचा वापर करून गाण्यांची देवाण-घेवाण केली असेल अथवा आपण गाणी या अॅपद्वारे ऐकत असाल तर तो सर्व डेटा आता 24 फेब्रुवारीनंतर निघून जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुगल आपलं गुगल प्ले म्युझिक आता YouTube Music वर रिप्लेस करणार आहे. त्यामुळे आधीची सेवा बंद करणार असल्याचं सांगितलं आहे