Sundar Pichai: Google च्या कर्मचारी कपातीनंतर सुंदर पिचईंच्या Salary मध्ये कपात; पण त्यांचा एकूण पगार किती पाहिलं का?

Google Layoffs 2023 Sundar Pichai Net Worth Salary Annual Income: पिचई यांनी वरिष्ठ कर्मचाऱ्यांनाही पगारकपातीचा सामना करावा लागेल असं नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीमध्ये जाहीर केलं आहे.

Updated: Feb 2, 2023, 06:25 PM IST
Sundar Pichai: Google च्या कर्मचारी कपातीनंतर सुंदर पिचईंच्या Salary मध्ये कपात; पण त्यांचा एकूण पगार किती पाहिलं का? title=
Sundar Pichai Net Worth Salary

Sundar Pichai Net Worth Salary Annual Income: एकेकाळी भारतामधून अमेरिकेत जाण्यासाठी विमानाचं तिकीट खरेदी करण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करणारे 'अल्फाबेट' (Alphabet) आणि गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांचा सध्याचा वार्षिक पगार थक्क करणार आहे. गुगलकडून (Google) करण्यात येणाऱ्या कर्मचारी कपातीच्या (google layoffs 2023) पार्श्वभूमीवर सध्या पिचई यांच्या पगाराचा (Sundar Pichai Salary) आकडा चर्चेचा विषय ठरत आहे. सुंदर पिचई (Sundar Pichai) हे सध्या 242 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार तब्बल 1 हजार 880 कोटी रुपये इतका पगार घेतात. गुगलच्या कर्मचाऱ्यांबरोबर झालेल्या टाऊन हॉलमधील बैठकीमध्ये पिचई यांनी सीनियर व्हाइस प्रेसिडंटपासून पुढील पदावरील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेतनकपातीचा सामना करावा लागणार असल्याचं जाहीर केलं. मात्र या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा नेमका किती पगार कापला जाणार हे पिचई यांनी सांगितलं नाही. मात्र वेतनकपात होणार हे मात्र निश्चित आहे. मात्र या पगार कपातीनंतरही पिचईंना दर महिन्याला वेतन म्हणून मिळणारी रक्कम थक्क करणारी आहे.

महिन्याचा पगार किती?

सध्या पिचई यांची महिन्याची सॅलरी आहे 163 कोटी रुपये. याशिवाय त्यांच्याकडे 'अल्फाबेट'चे शेअर्सही आहेत. पिचई यांची अंदाजित संपत्ती (Sundar Pichai NetWorth) ही 10 हजार 800 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. 'अल्फाबेट'च्या कर्मचारी संख्येत कपात करण्याच्या काही महिने आधीच कंपनीने पिचई यांना वेतनवाढ दिली होती. सीईओ म्हणून त्यांची कामगिरी उत्तम आहे. तसेच परफॉरमन्स स्टॉक यूनिट्सची संख्या 2019 रोजी असलेल्या 43 वरुन वाढवून 60 टक्के करण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या पगारामध्ये वाढ झाली.

सर्वात श्रीमंत प्रोफेश्नल्सच्या यादीत पिचई

याशिवाय पिचई यांना पीएसयूचे दोन भागही देण्यात आले. याची टार्गेट व्हॅल्यू 'अल्फाबेट'च्या रिस्ट्रिक्टेड स्टॉकच्या फॉर्मनुसार 63 मिलियन डॉलर आणि 84 मिलियन डॉलर इतकी आहे. आयआयएफएल हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 च्या आकडेवारीनुसार, पिचई सर्वाधिक श्रीमंत प्रोफेश्नल मॅनेजर्सच्या यादीमध्ये आहेत.

एकूण संपत्ती किती?

पिचई यांना 2 मिलियन डॉलर्स मूळ वेतन मिळतं. पिचई यांच्याकडे 'अल्फाबेट'चे एकूण 88 हजार 693 शेअर्स आहेत. कंपनीच्या एकूण शेअर्सपैकी हे 0.01 टक्के शेअर्स आहेत. त्यांच्याकडील सर्व शेअर्स, गुंतवणूक आणि पगार याचा विचार केल्यास 2023 मध्ये पिचई यांची एकूण संपत्ती 1 हजार 310 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच 1.31 बिलियन डॉलर इतकी आहे.

आलिशान गाड्या, घर अन् जमीन

पिचई यांच्याकडे जगातील सर्वात महागड्या आणि आलिशान गाड्यांचं कलेक्शन आहे. यामध्ये पॉर्शे, बीएमडब्ल्यू, रेंज रोव्हर, मर्सिडीज बेन्झसारख्या गाड्यांचा समावेश आहे. सुंदर पिचाईंचं कॅलिफॉर्नियामधील लॉस अल्टोस हिल्स येथील सांता क्लारा काउंटी येथे एक लक्झरी अपार्टमेंट आहे. हे घर त्यांनी 40 मिलियन डॉलर्सला विकत घेतलं आहे. 4 हजार वर्ग फूटांचं क्षेत्रफळ असलेल्या घरात सर्व आधुनिक सोयी आहेत. यामध्ये तीन मोठ्या बेडरुम, पाच बाथरुम, एक टेनिस कोर्ट आणि एक छोटं गोल्फ मैदान आहे. पिचई यांच्या नावावर वेस्टविंड वे आणि ला पालोमा रोड येथे 3.17 एकर जमीनही आहे.