स्मार्टफोन वापरणं तुमच्यासाठी धोक्याचं... Google च ठेवतोय तुमच्यावरती नजर, कसं ते जाणून घ्या

फार कमी लोकांना माहित असेल की, इंटरनेटच्या मदतीने गुगल कंपनी (गुगल) तुमची हेरगिरी देखील करते.

Updated: Dec 27, 2021, 12:31 PM IST
स्मार्टफोन वापरणं तुमच्यासाठी धोक्याचं...  Google च ठेवतोय तुमच्यावरती नजर, कसं ते जाणून घ्या title=

मुंबई : आजकाल प्रत्येक मोबाईलमध्ये इंटरनेट आपण वापरतोच. स्मार्टफोनला इंटरनेट शिवाय वापरने तसे शक्य नाही. त्यामुळे इंटरनेट ही आजच्या जीवनाती एक सामान्य गोष्ट झाली आहे. त्यात आता कोरोनामुळे सगळ्याच गोष्टी ऑनलाईन झाल्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण इंटरनेटचा वापर करतात. याच्या मदतीने मुले त्यांचा ऑनलाइन अभ्यास करतात. तर पालक घरून काम करून इतर कामे करू शकतात. इंटरनेट आणि स्मार्टफोनने आपलं आयुष्य अगदी सोपं केलं आहे.

परंतु ही तर झाली नाण्याची एक बाजू, परंतु याची दुसरी बाजू फार गंभीर आणि धोकादायक आहे. ज्याबद्दल देखील तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे.

गुगल तुमची हेरगिरी करतो

फार कमी लोकांना माहित असेल की, इंटरनेटच्या मदतीने गुगल कंपनी (गुगल) तुमची हेरगिरी देखील करते.

तुम्ही कधी आणि कुठे जाता? तुम्ही कोणाला ईमेल आणि मेसेज करता? तुम्ही कोणती वेबसाइट आणि पोर्टल पाहता? इंटरनेटवर (Google Activity) तुम्हाला कोणती माहिती मिळते. Google हे सर्व लक्षात घेते आणि नंतर त्याच्या संलग्न आणि इतर कंपन्यांसह डेटा सामायिक करते.

म्हणून तुम्ही पाहिलं असेल की, तुम्ही जर एखाद्या ठिकाणाला भेट दिली की गुगल तुम्हाला नोटीफिकेशनमधून ती जागा कशी होती हा प्रश्न विचारतो. तसेच तुम्ही पाहिलं असेल की, तुम्ही ऑनलाईन कोणतीही गोष्ट सर्च केली, तर तुम्हाला ती गोष्ट सगळ्या सोशल मीडिया साईटवर दिसते. परंतु तुम्ही असा कधी विचार केला का? की हे असं का घडलं असावं? किंवा हे असं का घडतं?

हे गुगलमुळेच घडतं. गुगल सगळ्या कंपनीला तुम्ही काय करता याची माहिती देतं.

वैयक्तिक डेटा लीक होण्याचा धोका

तुमचा स्मार्टफोन ही सोयीची गोष्ट आहे, पण तो तुम्ही काय करता याचा भांडा फोड करतो आणि तुमची वैयक्तिक माहिती तो सार्वजनिक डोमेनमध्ये जमा करतो. जे खरोखरच खुप धोक्याचं आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या गोष्टींपासून कसं लांब राहू शकता याबद्दल माहिती देणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही Google ला तुमची हेरगिरी करण्यापासून रोखू शकता आणि तुमच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करू शकता.

अशा प्रकारे Google चे ट्रॅकिंग थांबवा

तुम्ही तुमच्या मोबाईलचे गुगल सर्च इंजिन उघडा. तिथे Discover लिहिलेलं दिसेस, त्याच्याच जवळ  More लिहिलेलं तुम्हाला दिसेल.

त्यावर क्लिक केलात तर तेथे myactivity.google.com असे लिहिले तुम्हाला दिसेल. तेथे तुम्हाला Web & App Activity, Location History आणि YouTube History यासाठी 3 पर्याय दिसतील.

या सर्व पर्यायांच्या खाली तुम्हाला प्रत्येकी एक टिक बॉक्स दिसेल.

जर तुम्हाला Google ने तुमचं लोकेशन आणि तुम्ही काय काय करता हे ट्रॅक करू नये असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही त्या टिक बॉक्सच्या बाजूला असलेल्या बटणावर क्लिक करून त्याला बंद करु शकता.

यानंतर गुगलला गुगल, यूट्यूबचा सर्च हिस्ट्री आणि लोकेशनची माहिती मिळू शकणार नाही. जर तुम्ही असे केले नाही, तर Google या गोष्टी आपोआप सर्व गोष्टी सेव्ह करत राहिल.

Google Chrome देखील नियंत्रित करा

तुम्ही Google Chrome आणि Google Play वर तुमची गतिविधी देखील नियंत्रित करू शकता. तुम्ही या दोन्हीवरील आपल्या मागील क्रियाकलाप हटवू शकता. यासोबतच, तुम्ही काही गोष्टींसाठी गुगलला 'ट्रॅकिंग की परमिशन' आणि 'नो की' देणे देखील निवडू शकता.