गुगलचा मोठा निर्णय ; जीमेल मध्ये होतील हे बदल

जीमेलमध्ये लवकरच मोठे बदल होणार आहेत.

Updated: Apr 13, 2018, 03:39 PM IST
गुगलचा मोठा निर्णय ; जीमेल मध्ये होतील हे बदल title=

मुंबई : जीमेलमध्ये लवकरच मोठे बदल होणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, जीमेलचे अनेक फिचर्स बदलणार आहेत. लवकरच जीमेलचा नवा लूक समोर येईल. मात्र अजूनही याचा लूक कसा असेल हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. यापू्र्वी २०१४ मध्ये जीमेलने इनबॉक्सचा संपूर्ण लूक बदलला होता.

#1. नव्या फिचर्समुळे जीमेलसाठी बंद झालेल्या अॅप्सपर्यंत तुम्ही पोहचू शकाल. यामुळे युजर्संना जीमेलचा वापर करणे खूप सोपे होईल.

#2. जीमेलसोबत एक फिचर अजून जोडले गेले आहे. त्यामुळे जीमेलमध्ये ऑटोमॅटिक रिप्लाय करु शकाल. जसं- थॅंक्यू, लेट्स गो, ओके यांसारखी उत्तरे टाईप करण्याची गरज नाही. जीमेल मध्ये पहिल्यापासून टाईप उत्तरांचे पर्याय मिळतील. हे फिचर सध्या जीमेल उपलब्ध आहेत. या फिचरमुळे तुम्ही बिझी असतानाही रिप्लाय करु शकाल.

#3. स्नूज हे नवीन फिचर जीमेलमध्ये समाविष्ट करण्यात येईल. यामुळे तुम्ही ईमेल स्नूज करु शकाल. याचा अर्थ काही खास पिक्ससाठी इनबॉक्समध्ये मेल पॉप केले जाईल. जीमेलच्या वेब फिचरमध्ये वेब युजर्स ऑफलाईन सपोर्ट फिचर मिळेल. हे फिचर जूनपर्यंत येईल. याच्याबद्दल अजून अधिक माहिती देण्यात आलेली नाही.

युजर्स प्रतिक्षेत 

आता जीमेलच्या नव्या डिजाईनच्या प्रतिक्षेत युजर्स आहेत. मात्र ते युजर्संच्या पसंतीस पडते की नाही हे तर वेळेनुसारच कळेल. जीमेलचे नवे व्हर्जन खूप बदलले आहे. यामध्ये आकर्षक डिजाईनसह कलरफुल लूक दिसेल.