गुडन्यूज! आता इंटरनेटशिवायही पैसे ट्रान्सफर करणं शक्य

बऱ्याच लोकांना वाटते की मोबाईल फोनवरून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे. पण आता असं राहिलेलं नाही. आता तुम्हाला इंटरनेट कनेक्शनशिवाय देखील पैसे ट्रान्सफर करता येणार आहे.

Updated: Apr 20, 2019, 05:18 PM IST
गुडन्यूज! आता इंटरनेटशिवायही पैसे ट्रान्सफर करणं शक्य title=

मुंबई : बऱ्याच लोकांना वाटते की मोबाईल फोनवरून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे. पण आता असं राहिलेलं नाही. आता तुम्हाला इंटरनेट कनेक्शनशिवाय देखील पैसे ट्रान्सफर करता येणार आहे. BHIM App अॅपच्या मदतीने तुम्हाला पैसे ट्रान्सफर करणे सहज शक्य होणार आहे. बँक खात्याशी जोडलेल्या मोबाईल फोनच्या मदतीने असं करणं सोपं झालं आहे. त्यासाठी आपल्याला यूएसएसडी (USSD) आधारित मोबाईल बँकिंग वापरणे आवश्यक आहे.

आता BHIM App सोबत (USSD) देखील अपग्रेड करण्यात आले आहे. त्यासाठी आपल्याला एक स्मार्टफोन आणि त्यात BHIM APP अॅप डाउनलोड करावे लागेल. याशिवाय, आपल्याला BHIM APP वर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. एकदा सिम कार्ड आणि स्मार्टफोन आपल्या बँक खात्याशी कनेक्ट झाल्यानंतर, आपण भीम अॅपच्या मदतीने पैसे ट्रान्सफर करू शकता.

जर इंटरनेट उपलब्ध असेल तर आपल्याला यूपीआय (UPI)कोडच्या आधारवर व्यवहार करणे आवश्यक आहे. जर इंटरनेट उपलब्ध नसेल तर आपण यूएसएसडी (USSD) आधारवर मोबाईल बँकिंगचा पर्याय निवडू शकता. यासाठी आपल्याला *99# डायल करण्याची आवश्यकता आहे. आपल्या फोनवर एक स्वागत स्क्रीन असेल ज्यात सात पर्याय आहेत - पैसे पाठवा(Senod Money), पैसे मागवा(Request Money), चेक बॅलन्स(Check Balance), माझे प्रोफाइल(My Profile), प्रलंबित विनंती(Pending Requests, व्यवहार(Transaction) आणि यूपीआय(UPI) पिन. या पर्यायांना निवडल्यानंतर मोबाईल नंबर, पेमेंट पत्ता, सेव्हिंग बेनिफिट किंवा आयएफएससी(IFSC) कोड आणि अकाउंट नंबरच्या सहाय्याने ट्रान्सफर केले जाऊ शकतात.

बऱ्याच वेळा दूरवरच्या कनेक्शनवर इंटरनेट कनेक्शन उपलब्ध नसतं. म्हणून BHIM Appचे हे वैशिष्ट्य अतिशय उपयुक्त ठरणार आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीतही पैसे ट्रान्सफर करता येणार आहे.