फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेल ऑफर : स्मार्टफोनवर ७० टक्के सूट

अधिक विकले जाणारे स्मार्टफोन आहेत

Updated: Jan 24, 2019, 11:56 AM IST
फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेल ऑफर : स्मार्टफोनवर ७० टक्के सूट   title=

नवी दिल्ली- फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेलच्या निमित्ताने स्मार्टफोन खरेदीसाठी ग्राहकांना आकर्षक सूट देण्यात आली आहे. नवीन स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या सेलमध्ये टोगोफोगो या स्मार्टफोनवर ७० टक्के सूट देण्यात आली आहे. २१ जानेवारी ते २६ जानेवारीपर्यंत मोटोरोला, शाओमी आणि ऍपल या स्मार्टफोनवर ऑफर मिळणार आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, टोगोफोगो स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना २ वर्षांची वॉरंटी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर टोगोफोगो कंपनी किंवा इतर कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरदेखील आकर्षक सूट देण्यात आली आहे. टोगोफोगो कंपनीचे संचालक सौमित्रा गुप्ता यांनी सांगितले की, आम्ही तंत्रज्ञान सुलभ करण्यासाठी विशेष ऑफरची घोषणा केली आहे. ऍपल, शाओमी आणि मोटोरोला या सारखे स्मार्टफोन त्यांच्या बेवसाईटवर अधिक विकले जाणारे स्मार्टफोन आहेत. तसेच कमी किंमतीत चांगले स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही चांगली संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.