मुंबई: नवी कोरी गाडी घेणं प्रत्येकाला परवडतं असं नाही. त्यामुळे सेकंड हँड कार घेण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र सेकंड हँड गाडी खरेदी करताना काळजीपूर्वक तपासणी करणं गरजेचं आहे. कारण तपासणी न करता गाडी विकत घेतली तर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. गाडीचा दुरुस्ती खर्च परवडणार नाही. सेकंड हँड कार खरेदी करताना इंजिन, स्टीयरिंग, ट्रान्समिशन, क्लच प्लेट आणि सस्पेंशन हे नक्की तपासले पाहिजे. कारण यापैकी काहीही खराब झाले तर तुम्हाला खूप खर्च करावा लागू शकतो. आज आम्ही तुम्हाला कारचे सस्पेंशन आणि स्टीयरिंग कसे तपासायचे ते सांगणार आहोत.
कारचे सस्पेंशन कसे तपासायचे?
खडबडीत रस्त्यावर गाडी न्या आणि चालवताना लक्षात घ्या की समोरून कुठलाही आवाज येत नाही ना. जर आवाज येत असेल तर तो गाडीचा आर्म, शॉकर्स, लिंक रॉड, जंपिंग रॉड, शॉकर्स माउंट इत्यादी नसल्यामुळे असू शकतो. हे सर्व सस्पेंशनचे भाग आहेत. जर आवाज जास्त असेल तर काळजी घेण्याची गरज आहे. कारण सर्व भाग बदलावे लागतील आणि तसे झाल्यास त्याची किंमत खूप जास्त असेल.
कारचे स्टीयरिंग कसे तपासायचे?
कारच्या स्टीयरिंगची चाचणी घेण्यासाठी, प्रथम तुमची प्लेन पृष्ठभागावर घेऊन चला. त्यानंतर कारचा हँडब्रेक लावा आणि एसी बंद ठेवून कारचे इग्निशन ऑन करा. यादरम्यान कारच्या सर्व खिडक्या बंद ठेवाव्यात. संगीत प्रणाली देखील बंद ठेवा. तुम्हाला कारच्या आत खूप शांत वातावरण तयार करावे लागेल. असं झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी (उजवीकडे आणि डावीकडे) स्टीयरिंग पूर्णपणे फिरवा. हे करत असताना कोणताही आवाज येत तर नाही ना याकडे लक्ष ठेवा. जर आवाज येत असेल तर त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे किंवा तुम्हाला स्टीयरिंग बदलण्याची आवश्यकता असू शकते. यासाठी खूप खर्च होऊ शकतो.