ऑनलाइन डेटींग करतांना या गोष्टींकडे लक्ष दया

शहरी जीवन हे इंटरनेटवरच अवलंबून आहे. प्रत्येक जण छोटया- मोठया गोष्टीसाठी सुद्धा या ऑनलाइन ब्राउझिंगचा वापर करतो आणि हवी ती माहिती मिळवत असतो. मेट्रो शहरामध्ये आपण आपले जीवन एवढे व्यस्त केले आहे की, आपण स्वत:लाच वेळ देऊ शकत नाही. ही खूपच दुदैवी बाब आहे. त्याचाच एक भाग म्हणजे ऑनलाइन डेटींग. या वर्तमान काळात शहरी प्रेमीयुवक हे आपल्या प्रेमाला ऑनलाइनच शोधत आहेत. गुगलच्या अहवालानुसार, भारतात पन्नास टक्के लोक ऑनलाइन डेटींग करत आहे. तुम्ही ही यांच्यामधले एक असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टींकडे जरूर लक्ष दया.

Updated: Aug 1, 2017, 11:37 AM IST
ऑनलाइन डेटींग करतांना या गोष्टींकडे लक्ष दया title=

मुंबई : शहरी जीवन हे इंटरनेटवरच अवलंबून आहे. प्रत्येक जण छोटया- मोठया गोष्टीसाठी सुद्धा या ऑनलाइन ब्राउझिंगचा वापर करतो आणि हवी ती माहिती मिळवत असतो. मेट्रो शहरामध्ये आपण आपले जीवन एवढे व्यस्त केले आहे की, आपण स्वत:लाच वेळ देऊ शकत नाही. ही खूपच दुदैवी बाब आहे. त्याचाच एक भाग म्हणजे ऑनलाइन डेटींग. या वर्तमान काळात शहरी प्रेमीयुवक हे आपल्या प्रेमाला ऑनलाइनच शोधत आहेत. गुगलच्या अहवालानुसार, भारतात पन्नास टक्के लोक ऑनलाइन डेटींग करत आहे. तुम्ही ही यांच्यामधले एक असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टींकडे जरूर लक्ष दया.

 

प्रोफाईलची विशेष काळजी घ्या

या ऑनलाइन डेटींगचा वापर करताना तुमचा प्रोफाइल फोटो आकर्षक आणि नीटनेटका हवा. तसेच आपल्या प्रोफाईल तपशीलची विशेष काळजी घ्या.

सेल्फीचा वापर करू नये

ऑनलाइन डेटींगसाठी बनवलेल्या या प्रोफाइलमध्ये सेल्फीचा वापर करू नये. संशोधनानुसार, असं केल्याने ४० टक्के तुम्ही आवडण्याची शक्यता कमी होते.

प्रश्नांचा वापर करा

तुमचा प्रोफाइलमध्ये प्रश्नांचा वापर जरूर करा. म्हणजेच, तुम्हाला फिरायला आवडते का? तुमचं ध्येय काय आहे? तुम्हाला पण हे आवडते का? संशोधनानुसार, अशाप्रकारे प्रश्न विचारल्याने समोरच्या व्यक्तीला तुमच्याशी बोलण्याची इच्छा होईल.  

 

अशा फोटोंचा वापर करू नये

संशोधनाच्या मते, ज्या फोटोमध्ये तुमचा चेहरा दिसत नसेल आणि जर तुम्ही गॉगल किंवा नजरेचा चष्मा लावला असेल तर असे फोटो टाकू नये. कारण अशा फोटोमुळे तुमचा चेहरा नीट दिसणार नाही. जजमेंट करताना थोडं कठीण होईल.

फोटोत बॅग्राऊंडचा वापर करू नये

तुमच्या प्रोफाइलमध्ये बॅग्राऊंडला जास्त जागा असेल अशा फोटोचा वापर करा. अशा फोटोत तुमच्यापेक्षा बॅगराऊंडच्या जागेला एवढे महत्त्व नसते.