मुंबई : फ्लिपकार्टचा बिग बचत धमाल सेल सुरू आहे. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समध्ये भरघोस सुट दिली जातेय. त्यातच जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 5 हजार रुपये असेल तर तुमच्यासाठी या सेलमध्ये स्मार्टफोन खरेदीचे अनेक पर्याय आहेत. नेमके हे स्मार्टफोन कोणते आहेत ते जाणून घेऊयात.
Vivo T1 5G: जर तुम्ही Vivo च्या 16,990 रुपयांच्या या 5G स्मार्टफोनसाठी HDFC बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्डने पैसे भरले तर तुम्ही एक हजार रुपये वाचवू शकता आणि जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात ते खरेदी करून तुम्ही 12,500 रुपयांपर्यंत बचत करू शकता. अशा प्रकारे, तुम्हाला हा फोन 3,490 रुपयांना मिळू शकेल.
Redmi Note 10T 5G: Redmi च्या 5G स्मार्टफोनची किंमत 11,999 रुपये आहे परंतु तुम्ही तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात तो खरेदी केल्यास, तुम्ही 11,250 रुपयांपर्यंत बचत करू शकता. अशा प्रकारे तुम्ही हा फोन 749 रुपयांमध्ये घरी घेऊन जाऊ शकता.
Infinix Zero 5G: 17,999 रूपयांच्या या 5G स्मार्टफोनवर आकर्षक बँक आणि एक्सचेंज ऑफर दिल्या जात आहेत. तुम्ही कोणतेही बँक कार्ड वापरून 2 हजार रुपये वाचवू शकता आणि तुम्हाला फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डसह आणखी 800 रुपयांची सूट मिळेल. एक्सचेंज ऑफरसह तुम्ही 12,500 रुपयांपर्यंत बचत करू शकता. अशा प्रकारे, हा फोन 2,699 रुपयांना खरेदी करता येईल.
Samsung Galaxy F23 5G: 128GB स्टोरेज असलेला हा Samsung 5G स्मार्टफोन 16,999 रुपयांना विकला जात आहे. आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर, वापरकर्त्यांना एक हजार रुपयांची सूट मिळेल आणि त्यांच्या जुन्या फोनच्या बदल्यात ते खरेदी केल्यास, 12,500 रुपयांपर्यंत बचत केली जाऊ शकते. हा सॅमसंग फोन तुम्हाला 3,499 रुपयांना मिळू शकतो.
Poco M3 Pro 5G: जर तुम्ही 16,499 रुपयांचा हा 5G स्मार्टफोन खरेदी करताना फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला 825 रुपयांची सूट मिळेल. एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ घेतल्यावर तुम्हाला 12,500 रुपयांची आणखी सूट मिळेल. एकूणच, तुम्ही हा फोन 3,174 रुपयांना खरेदी करू शकता.
फ्लिपकार्टचा बिग बचत धमाल सेलचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे तुम्हाला आजच्याच दिवशी ऑफरमध्ये फोन खरेदी करता येणार आहेत.