नवीन वर्षात फ्लिपकार्टची स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर

नवीन वर्षात अनेक कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 30, 2017, 04:08 PM IST
नवीन वर्षात फ्लिपकार्टची स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर title=

नवी दिल्ली : नवीन वर्षात अनेक कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. 

देशातील सर्वात मोठी ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट 2018 मध्ये मोबाईल बोनान्झ सेल लॉन्च करत आहे. 3 जानेवारी ते 5 जानेवारी या कालावधीत फ्लिपकार्टवर हा सेल असणार आहे.

या सेलमध्ये, लोकांना कमी पैशात जबरदस्त स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळेल. शाओमी मी A1, पिक्सेल 2, पिक्सेल 2 XL, Moto G5 प्लस, Redmi नोट 4, लेनोवो K5 नोट, सॅमसंग S7 यावर मोठी ऑफर असणार आहे.

शाओमी ए 1- फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये तुम्हाला शाओमी ए 1 वर 2000 रुपये सूट मिळेल. 14,999 रुपयांचा हा फोन तुम्हाला 12,999 रूपयांना मिळेल.

गूगल पिक्सल 2- एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवरुन पेमेंट केल्यास  गूगल पिक्सेल 2 तुम्हाला 13,000 रुपयांची सूट मिळेल. हा फोन तुम्हाला 39,999 रुपयांना मिळेल. एवढेच नव्हे, तर एक्स्चेंज मोबाईलवर तुम्हाला 18,000 रुपयेपर्यंत सूट मिळू शकते. त्यानंतर या स्मार्टफोनची किंमत 21,999 रुपये असेल. पिक्सेल 2 XL वर 2,000 रुपयांची अतिरिक्त एक्स्चेंज ऑफर मिळेल. हा स्मार्टफोन तुम्हाला 52,999 रुपयांना मिळेल.

मोटो जी 5 प्लस - सध्या स्मार्टफोनची किंमत 16,999 रुपये आहे. परंतु आपण फ्लिपकार्टच्याया ऑफरमध्ये तो तुम्हाला 9,999 रुपयांना मिळेवल.

सॅमसंग गॅलेक्सी A7 - या महिन्यात फ्लिपकार्टवर स्मार्टफोनवर 15,000 रुपयांपर्यंत ऑफर देण्यात येईल तसेच 18,000 रुपयांपर्यंत एक्स्चेंजची ऑफर दिली जाईल. त्यानंतर तुम्ही हा फोन 26,999 रुपयांना मिळवू शकता.

रेडमी नोट 4- फ्लिपकार्डच्या या सेलमध्ये तुम्हाला शाओमीच्या या फोनवर दोन हजार रुपये सूट देण्यात येईल. या सूटनंतर आपण 10,999 रुपयांना हा फोन खरेदी करु शकता.

सॅमसंग गॅलेक्सी ऑन 56,490 रुपये, पॅनसोनिक इलुगा रे मॅक्स 9,999 रुपये, पॅनसोनिक इलुगा ए3 6.999 रुपयांना, सॅमसंग गॅलेक्सी G3 प्रो 2 जीबी 6.990 रुपयांना मिळेल.