मुंबई : कोरोनानंतर सोशल मीडिया आणि फोन दोन्ही वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे. लोक ऑनलाईन खरेदीपासून ते ऑनलाईन पेमेंटपर्यंत अनेक गोष्टी फोनवर करतात. याचाच फायदा हॅकर्स घेत आहेत. फादर्स डेच्या निमित्ताने सगळेजण Whatsapp ला वेगवेगळे मेसेज पाठवत आहेत. मात्र तुम्हालाही असा काही मेसेज आला असेल तर आताच सावध व्हा.
व्हॉट्सअॅपवर एक धोकादायक घोटाळा सुरू आहे. फादर्स डेनिमित्त खास ऑफर देण्याचा हा मेसेज सगळीकडे फिरत आहे. आकर्षक ऑफर्सच्या नावाखाली लोकांची लूट करण्याचा हॅकर्सचा डाव आहे. या सापळ्याचं मुख्य उद्देश व्हॉट्सअॅप युजर्स महत्त्वाचा आणि वैयक्तिक डेटा चोरणे आहे. त्यानंतर खात्यातून पैसे चोरण्याचाही डाव आहे.
Heineken आणि Screwfix नावाच्या कंपन्यांकडून ही खास ऑफर असल्याची बतावणी केली जात आहे. मात्र या दोन्ही ब्रॅण्डने हे मेसेज फेक असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे अशा कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नये असं सांगितलं आहे.
फादर्स डे निमित्त तुम्हाला कोणत्याही ऑफर्स जर Whatsapp वर आल्या असतील तर थेट क्लीक करून त्या लिंकवर जाऊ नका. त्यामुळे तुम्ही अडकू शकता. तुम्ही हॅकर्सच्या जाळ्यात अडकू शकता. त्यामुळे अशा प्रकारच्या मेसेजपासून सावध राहा.