मुंबई : एसटी महामंडळ अर्थात महाराष्ट्र राज्य प्रादेशिक परिवहन महामंडळाचे (Maharashtra State Road Transport Corporatio) समाजमाध्यमांवर बनावट खाते उघडण्यात आले आहे. त्यामुळे आता एसटी महामंडळ याबाबत काय करावाई करणार याकडे लक्ष लागले आहे. MSRTCचे बनावट ट्विटर, इंस्टाग्राम अकाउंटवरुन माहिती देण्यात येत आहे. मात्र ही माहिती अधिकृत नाही. त्यामुळे ही दोन्हा अकाउंट बंद करण्यासाठी कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, एसटी महामंडळाचे अधिकृत ट्विटर अकाउंट असल्याचे सांगून एसटी महामंडळाचा या बनावट अकाउंटवर लोगोही वापरण्यात आला आहे. तसेच इंस्टाग्रामवर ऑफिशिअल अकाउंट म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. तसेच गाव तिथे रस्ता... रस्ता तिथे एसटी असाही उल्लेख कऱण्यात आला आहे. ट्विटर आणि इंस्टाग्रामवरील ही दोन्ही अकाउंट बनावट असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच लवकरच एस. टी. महामंडळाची अकाउंट प्रसिद्ध केली जातील, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.
एस. टी. महामंडळाचे खालील स्क्रीनशॉट मध्ये दाखवलेले ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंट हे अधिकृत नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी व त्यावरील कोणत्याही अपडेट वर विश्वास ठेवू नये. एस.टी. महामंडळाकडून येत्या २ दिवसांत अधिकृत सोशल मिडिया हॅन्डल्स प्रसिद्ध केले जातील. @advanilparab pic.twitter.com/SG0sfe6uXh
— Satej (Bunty) D.Patil (@satejp) July 14, 2020
या दोन्ही बवावट अकाउंटबाबत राज्यमंत्री सतेज पाटील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या अकाउंटवरील माहिती अधिकृत नाही. महामंडळाकडून येत्या दोन दिवसांत अधिकृत सोशल मीडिया हॅन्डल्स प्रसिद्ध केले जातील, असेही सतेज पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, एस. टी. महामंडळाचा लोगोचा आणि सोशल मीडियाच्या नावाखाली गैरवापर होत असल्याने सतेज पाटील यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे की, एसटी महामंडळाचे खालील स्क्रीनशॉटमध्ये दाखवलेले ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंट हे अधिकृत नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच त्यावरील कोणत्याही अपडेटवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. एस. टी. महामंडळाकडून येत्या दोन दिवसांत अधिकृत सोशल मिडिया हॅन्डल्स प्रसिद्ध केले जातील, असेही ते म्हणाले.