मुंबई : दरवर्षी 22 एप्रिलला वसुंधरा दिवस साजरा केला जातो. यंदा वसुंधरा दिनाचं औचित्य साधून गूगलनेही खास डूडल आणि सोबतच एक व्हिडिओ मेसेज अटॅच केला आहे. या व्हिडिओमध्ये यूएनच्या शांतिदूत डेम जेन मॉरिस गुडल यांची झलक दिसत आहे. गूगल डूडलसोबत अटॅच करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये पृथ्वीला वाचवण्यासाठी आपण काय करायला हवे तसेच पृथ्वीचं महत्त्व याबाबत खास संदेश देण्यात आला आहे.
लहानपणापासूनच डेम जेन मॉरिस गुडल या निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्या आहेत. त्यांनी व्हिडिओमध्ये एक खास आठवणही शेअर केली आहे. काही वर्षांपूर्वी त्या आफ्रिकेत तंजानियामधील गोम्ब स्ट्रीम नॅशनल पार्कमध्ये होत्या. तेथे अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. तेव्हा त्या जंगलातच होत्या. बर्याच वेळाने जेव्हा पाऊस थांबला तेव्हा त्यांनी जवळ असलेल्या चिंम्पाझीचा गंध अनुभवला, जंगलातील जंतूंच्याही आवाजाचीही त्यांना चाहूल लागत होती. हा अनुभव मंत्रमुग्ध करणारा होता असे त्यांनी सांगितले.
पावसाच्या अनुभवानंतर अगदी लहानातल्या लहान जीवाचाही आपल्या आयुष्यात वाटा असतो हे प्रकर्षाने जाणवले.
गुडल यांनी व्हिडिओमध्ये निसर्गासोबत सांमजस्य राखत जीवनाचा आनंद घेण्यात अर्थ डे शिवाय इतर कोणता चांगला पर्याय आहे? प्रत्येक जीव खास आहे. त्याचा प्रभाव प्रत्येकदिवशी पृथ्वीवर होत असतो. त्यामुळे हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे की आपण कोणत्या प्रकारे बदल करू इच्छितो.