मुंबई : पॅनोसोनिकने शुक्रवारी नवा स्मार्टफोन लॉन्च केला. Eluga I7 हा भारतात लॉन्च केला. एलुगा आय7 हा एक बजेट स्मार्टफोन आहे. महत्वाचं म्हणजे या स्मार्टफोनमध्ये आरबो हब आहे. जो पॅनोसोनिकचा स्वत:चा एचआय वर्च्युअल असिस्टंट आहे. असं म्हणतात की हा असिस्टंट युझरला सर्व समाधान शोधून देणार. आरबो हब युझरला क्रिकेट, न्यूज, पेमेंट, कॅब बुकिंग अशी अनेक कामं करण्यात मदत करेल. आरबो हब हा एलुगा आय7 सोबत ओटीए अपडेटने देण्यात येईल.
पॅनासोनिक एलुगा आय7 ची भारतातील किंमत आहे ६ हजार ४९९ रूपये. यात २ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल स्टोरेज, फोन २४ एप्रिल रोजी ई-कॉ़मर्स साईट फ्लिपकार्टवर ब्लू, ब्लॅक, आणि गोल्ड वेरिएंटमध्ये उपलब्ध असेल.
डुअल सिमवाल्या पॅनासोनिक एलुगा आय7, अँड्रॉईड 7.0 नूगा आउट ऑफ द बॉक्सवर चालतो.
फोनमध्ये 5.45 इंचाचा एचडी प्लस बिग व्ह्यूव डिस्प्ले आहे.
याचा आस्पेक्ट रेशिओ 18:9 आहे.
फोनमध्ये 2.5 कवर्ड ग्लास डिझाईन दिलेला आहे.
पॅनासोनिक Panasonic Eluga I7
डिस्प्ले 5.45 इंच
प्रोसेसर 1.3 गीगाहर्टझ क्वाड-कोर
फ्रंट कॅमरा 8-मेगापिक्सल
रिझोल्यूशन 720x1440 पिक्सल
रॅम 2 जीबी
ओएस अॅण्ड्रॉईड 7.0
स्टोरेज 16 जीबी
रियर कॅमेरा 8 मेगापिक्सल
बॅटरी क्षमता 4000 एमएएच