केवळ 1 रुपयांत मिळतोय Poco F1

 आज संध्याकाळी 4 वाजता हा सेल सुरू होत असून तो 25 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. 

Updated: Oct 23, 2018, 02:07 PM IST
केवळ 1 रुपयांत मिळतोय Poco F1  title=

मुंबई : काही दिवसांपूर्वीच अमेझॉन आणि फ्लिपकार्टचा फेस्टिवल सेल काही दिवसांपूर्वीच संपला. याला देशभरातून खूप मोठा प्रतिसाद मिळाला. यामध्येही तुम्ही मोबाईल खरेदी करु शकला नसाल तर खूप मोठी संधी तुमच्यासाठी चालून आलीयं. शाओमी इंडियाने तुमच्यासाठी 'Diwali with Mi' सेल आणलाय. या सेलनुसार तुम्ही शाओमीचे प्रोडक्ट शानदार ऑफर आणि सवलतीतून खरेदी करु शकता. आज संध्याकाळी 4 वाजता हा सेल सुरू होत असून तो 25 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे.

फ्लॅश सेलमध्ये तुम्ही शाओमीचे प्रो़डक्ट केवळ 1 रुपयांमध्येही खरेदी करु शकता.

थोड्याच वेळात शाओमीचा फ्लॅश सेल सुरू होणार आहे. आज या सेलसाठी  Poco F1 स्मार्टफोन निवडला गेलायं. सध्या बाजारात या स्मार्टफोनची किंमत 21 हजार आहे. पण हा फोन तुम्ही केवळ 1 रुपयांमध्ये खरेदी करु शकता.

यासाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत.  

4 वाजण्याआधी mi.com वर लॉग इन करा.

जसा Poco F1 दिसेल तसं वेळ फुकट न घालवता Buy बटणावर क्लिक करा.

हा प्रोडक्ट तुमच्या कार्टमध्ये अॅड होईल.

ही प्रक्रीया पूर्ण करुन तुम्ही स्मार्टफोन खरेदी करु शकता.

आपल्या कार्डची डिटेल्स कंपनीच्या साइटवरून आधीच सेव्ह करु शकता.

उद्या फ्लॅश सेल 

बुधवारी संध्याकाळी 4 वाजता  स्मार्टफोन रेडमी नोट 5 प्रो (Redmi Note 5 Pro) फ्लॅश सेलसाठी उपलब्ध होणार आहे.

सेलच्या शेवटच्या दिवशी तुम्ही Mi A2 फ्लॅश सेलमध्ये खरेदी करु शकता. याशिवाय कंपनी Small=Big  नावाची ऑफर आणतेय.

यामध्ये तुम्ही रेडमी 6A + 10000 mAh एमआय पॉवरबॅंक केवळ 699 रुपयांमध्ये खरेदी करु शकता.

सेल नसताना हा प्रोडक्ट तुम्हाला 6 हजार 698  इतका महाग मिळू शकतो.