नवी दिल्ली : सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगमने (बीएसएनएल) ग्राहकांसोठी धमाकेर ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना तब्बल ६०% इतका घसघशीत डिस्काऊंट मिळेल. 'लूट लो' असे या ऑफरचे नाव आहे.
बीएसएनएलची ही ऑफर आजपासून (१ नोव्हेंबर) सुरू झाली आहे. महत्त्वाचे असे की, ही ऑफर प्रिपेड कार्डधारकांसाठी नसून, केवळ पोस्टपेड ग्राहकांसाठीच आहे.
कशी आहे ऑफर?
'लूट लो' ऑफर अंतर्गत ग्राहकाला २२५, ३२५, ५२५, ७२५, ७९९, १,१२५, १,५२५ रूपयांचे हे एकूण ७ पोस्टपेड टेरीफ प्लॅन उपलब्ध आहेत. या शिवाय ग्राहकाला रिचार्ज पॅकवर ५ टक्के अधिक डेटाही मिळणार आहे. बीएसएनएलची ही ऑफर फिक्स्ड मंथली चार्चेसवाल्या प्लॅनलाही लागू असेन. यात बीएसएनएलच्या ९९, १४९, आणि २२५ रूपायंच्या प्लॅनवर अनुक्रमे ५०० MB, ५००MB,आणि ३G डेटा फ्री मिळेल. तर, २२५, ३२५, ५२५, ७२५, ७९९, १,१२५ आणि १,५२५ रूपयांच्या पॅकवर अनुक्रमे ७GB, १५GB, ३०GB, ६०GB आणि ९०GB इतका फ्री डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये स्पीडचा कोणता अडथळा असणार नाही.
टेलिकॉम क्षेत्रात सध्या प्रचंड स्पर्धा सुरू आहे. त्यात खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत आपलेही अस्तित्व दाखवून देण्यासाठी बीएसएनएलने धमाकेदार प्लान बाजारत उतरवले आहेत.