मुंबई : रिलायन्स जिओने हॅप्पी न्यू ईयर २०१८ ऑफर अंतर्गत दोन प्रीपेड रिचार्ज प्लान लाँच केले आहेत. यात एक प्लान १९९ रुपयांचा आणि दुसरा प्लान २९९ रुपयांचा आहे. मात्र जिओचे हे प्लान तुमच्यासाठी किती फायदेशीर आहेत? १९९ रुपयांमध्ये दुसरी कंपनी जिओइतके फायदे देते का? एखाद्या प्लानमध्ये तुम्हाला इतकं सगळं फ्री मिळतं का? यासाठी जिओचा हा प्लान सर्वात स्वस्त प्लान मानला जात आहे.
जिओच्या १९९ रुपयांच्या प्लानमध्ये १.२ जीबी डेटा दिवसाला मिळतोय. या प्लानची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. तसेच यात अनलिमिटेड एसटीडी, लोकल व्हॉईस कॉलिंगची सुविधा आहे. यासोबतच एसएमएसही दिले जात आहेत.
जिओच्या २९९ रुपयांच्या प्लानमध्ये ५६ जीबी डेटा महिन्याला दिला जात आहे. या ऑफरमध्ये युजर्सला दिवसाला २ जीबी डेटा मिळतो. यासोबतच अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंगची सुविधाही या प्लानमध्ये आहे.
जिओच्या १९९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना दिवसाला १.२ जीबी डेटा मिळतोय. याची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. याचाच अर्थ ग्राहकांना संपूर्ण महिन्यात ३३.६ जीबी डेटा मिळेल.
दोन नव्या प्लानशिवाय जिओचे जुने प्लानही ग्राहकांसाठी सुरु ठेवण्यात आलेत. कंपनीच्या १४९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह ४ जीबी डेटा मिळतोय. याशिवाय ३९९, ४५९, ४९९ रुपयांचे प्लानही सुरु आहेत. या सर्व प्लानमध्ये दररोज एक जीबी डेटा मिळतो.