बजाजने लॉन्च केली नवी दमदार पल्सर NS 200

तुम्ही नवी बाईक घेण्याचा विचार करत असाल तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे 

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 3, 2017, 11:06 AM IST
बजाजने लॉन्च केली नवी दमदार पल्सर NS 200 title=
File Photo

नवी दिल्ली : तुम्ही नवी बाईक घेण्याचा विचार करत असाल तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, प्रसिद्ध दुचाकी वाहन निर्माता कंपनी बजाजने आपल्या ग्राहकांसाठी नवी बाइक एनएस 200 (Pulser NS 200) लॉन्च केली आहे.

कंपनीने ही बाईक नव्या फिचर्ससोबत लॉन्च केली आहे. नव्या बजाज पल्सर एनएस 200 (Pulser NS 200) मध्ये युजर्सची सुरक्षा लक्षात घेऊन एबीएस (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम)चं फिचर उपलब्ध करुन दिलं आहे.

पल्सर एनएस 200 (Pulser NS 200) मध्ये 200 CC चं लिक्विड कूल्ड इंजिन देण्यात आलं आहे.

तर, बाईकमधील अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम गाडीची चाक लॉक होण्यापासून रोखतं. तसेच बाईक स्लिप होण्यापासूनही एबीएस फिचर रोखतं. या सिस्टममुळे अपघात रोखण्यास मदत होणार आहे.

बजाज ऑटोच्या मोटरसायकल विभाग अध्यक्ष एरिक वास यांनी सांगितलं की, एबीएस सिस्टमसंदर्भात ग्राहकांनी अनेकदा मागणी केली होती. त्यामुळेच अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम NS 200 मध्ये देण्यात आली आहे.

अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टममुळे बाईकचं प्रदर्शन आणि आकर्षण वाढण्यास मदत होणार असल्याचंही वास यांनी सांगितलं. कंपनीने दिल्लीमध्ये या बाईकची एक्स शोरुम किंमत १.०९ लाख रुपये ठेवली आहे.