मुंबई : Netflix हे व्हिडिओ स्ट्रीमिंग ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे कन्टेन्ट पाहायला मिळतात. ज्यामुळे बहुतांश लोक या व्हिडीओ पाहण्यासाठी येथे येतात. परंतु हे प्लॅटफॉर्म फ्री नाही. यावरील व्हिडीओ पाहण्यासाठी तुम्हाला त्याचं सबस्क्रिप्शन विकत घ्यावे लागले. त्यामुळे अनेक असे लोक आहेत. ज्यांना याचे पैसे देणं परवडत नसल्यामुळे त्यांनी अनोखी युक्ती शोधून काढली आहे. 3 ते 4 मित्र किंवा कुटूंबातील व्यक्ती एकत्र येऊन एक सबस्क्रिप्शन विकत घेतात आणि तेच सर्वजण पाहाता, ज्यामुळे पैशांची बचत होतो.
Netflix ने कंपनीचा लॉस विचार घेता आता अशा लोकांवर कारवाई करणं सुरु केलं आहे.
व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा प्रदाता कंपनी नेटफ्लिक्सने 2 लाखांहून अधिक ग्राहक कमी केले आहेत. Netflix पुनरागमन करण्यासाठी हे केलं आहे.
नेटफ्लिक्सने म्हटले आहे की, जे वापरकर्ते कुटुंबाबाहेरील लोकांसह आपलं खातं शेअर करतात त्यांच्यासाठी ते अधिक शुल्क आकारतील. TechCrunch च्या मते, कंपनीने मार्चमध्ये चिली, कोस्टा रिका आणि पेरूमध्ये नवीन शुल्काची चाचणी सुरू केली, परंतु आता पुढील एका वर्षात ते जागतिक स्तरावर याला आणण्याची योजना आखत आहेत.
या वैशिष्ट्याची चाचणी घेण्यासाठी जवळपास एक वर्ष लागेल आणि नंतर कंपनी आपलं खातं इतरांसह शेअर करणाऱ्या लोकांना शोधून त्यांच्यावर कारवाई करणार आहे.
कंपनीचे मुख्य उत्पादन अधिकारी ग्रेग पीटर्स यांनी सांगितले की, कंपनी गेली दोन वर्षे या दिशेने काम करत आहे. त्याची नुकतीच चाचणी करण्यात आली आणि जे लोक आपलं खातं इतरांसह शेअर करतात, त्यांच्यावर जास्तीची रक्कम आकारण्यासाठी, ती रक्कम आधी त्यांना ठरवावी लागेल, ज्यासाठी त्यांना थोडा वेळ लागेल.
Netflix काही ठिकाणी वापरकर्त्यांना मानक आणि प्रीमियम सबस्क्रिप्शनसह सब-खाती जोडण्याची परवानगी देखील देत आहे. हे सर्व खाते अशा लोकांसाठी आहे जे ग्राहकांसोबत राहत नाहीत.
प्रत्येक उप-खात्याचे स्वतःचे प्रोफाइल आणि शिफारस इ. असेल. ते GPS आधारित नसेल. यामध्ये आयपी अॅड्रेस, डिव्हाईस आयडी इत्यादींचा वापर केला जाईल आणि यावरून हे कळेल की युजर्स त्यांचे अकाउंट घराबाहेरील लोकांसोबत शेअर करत आहेत की नाही.