Tips For Selling Used Car: जुनी कार विकताना आपल्याला नेहमी एक प्रश्न सतावतो, तो म्हणजे कारची किंमत किती मिळेल. आपण एक ठराविक रक्कम विचारही करुन ठेवलेली असते, पण ती किंमत मिळेलच याची शाश्वती नसते. पण जुनी कार विकताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमची जुन्या कारचीही चांगल्या किंमतीला विक्री होऊ शकते.
वॉशिंग
एखादा ग्राहकाने कार घेण्यास पसंती दाखवली आणि तो कार बघण्यासाठी येत असेल तर ग्राहक येण्याआधी कार आतुन आणि बाहेरुन चांगली धुवून ठेवा. जेणेकरून जेव्हा तो ग्राहक कार पाहिला येईल तेव्हा त्याला कार चांगल्या कंडिशनमध्ये असल्याचं जाणवेल. (tips for selling used car)
रबिंग
जर तुमच्या कारचा रंग काहिसा फिकट पडला असेल तर कार विकण्याआधी ती कारसाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकलने घासून घ्या, म्हणजे कारचा रंग पुन्हा चमकेल.
ड्राई क्लीन
कारचं इंटेरिअर चांगलं नसेल तर कार विकत घेणाऱ्या ग्राहकावर चांगला प्रभाव पडत नाही. त्यामुळे कारचं इंटिरिअर चांगलं आणि स्वच्छ असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे कार आतून ड्राई क्लीन नक्की करा.
तुम्ही एखादी चांगली आणि सुंदर गोष्ट पाहता तेव्हा तुम्ही त्याकडे आकर्षित होता. कार विकण्याच्या तयारीत असताना तुम्ही वॉशिंग, रबिंग आणि ड्राय क्लीनिंग केले पाहिजे हाच उद्देश आहे.
कारची किंमत चांगली मागा
जुनी कार विकताना तुम्ही कारची जितकी किंमत निश्चित केली आहे त्यापेक्षा थोडी जास्त किंमत ग्राहकाला सांगा. जेणेकरून वाटाघाटी करताना तुम्हाला हवी ती किंमत मिळेल.
पेपर्स सोबत ठेवा
कार विकताना कारची संपूर्ण कागदपत्र सोबत ठेवा, जेणेकरुन ग्राहकाला डील रद्द करण्याची संधी मिळू शकेल. या सोप्या टीप्स फॉलो करा आणि तुमच्या जुन्या कारची चांगली किंमत मिळवा.