Maruti Celerio : चांगली कार घ्यायचीये, म्हणून तुम्हीही मनाजोग्या कारच्या किमती कमी होण्याच्या प्रतीक्षे आहात का? बरं, त्यातही पेट्रोल- डिझेलच्या किमती वाढत असल्यामुळं सीएनजी कारच्या पर्यायाला तुम्ही प्राधान्य देताय का? मग एक पर्याय नक्की विचारात घ्या. कारण, पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी कारची रनिंग कॉस्ट अर्थात इंधनाचा दर कमी असतो. थोडक्यात खर्च कमीच होतो. असा खर्च की करणारी एक कार आता मारुतीनं पुन्हा सादर केली आहे.
सध्याच्या घडीला देशात सर्वाधिक विक्री होणारी सीएनजी कार म्हणजे मारुती सुझुकीची सेलेरियो सीएनजी. कारच्या मायलेजला प्राधान्यस्थानी ठेवणाऱ्यांपैकी तुम्हीही एक आहात, तर ही कार एक उत्तम पर्याय आहे. मारुतीच्या परवडणाऱ्या कार मॉड्युलमध्ये Celerio, Wagon R, Alto K10, S-Presso चाही समावेश आहे.
सिलेरियो सीएनजी ही कार प्रती किलो सीएनजीमध्ये (सध्याचे दर 80 रुपये प्रती किलो) 35.60 किमी इतकं अंतर प्रवास करू शकते. त्यामागोमाग वॅनरआर सीएनजी 32.52km आणि ऑल्टो 33.85km इतकं मायलेज देते. सिलेरियो ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला साधारण 5.37 लाख रुपये इतकी रक्कम बेस मॉड्युलसाठी खर्च करावी लागते. पुढे ही किंमत 7.09 लाख रुपये, तर सीएनजी व्हेरिएंटची किंमत 6.74 लाख रुपयांच्या घरात आहे.
सेलेरियो कार चार ट्रिम- एलएक्सआय, वीएक्सआय, जेडएक्सआय आणि जेडएक्सआय+ मध्ये उपलब्ध आहे. यापैकी वीएक्सआय ट्रीममध्ये सीएनजीचा पर्याय उपलब्ध आहे. या कारमध्ये 1.0-लीटर पेट्रोल इंजिन असून यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड एएमटी पर्याय उपलब्ध आहेत. कारमध्ये हायटेक इन्फोटेन्मेंट सिस्टीम असून, पॅसिव्ह किलेस एंट्री, स्टीयरिंग व्हील माउंटेड ऑडियो कंट्रोल्स, सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि टर्न इंडिकेटर्ससह इलेक्ट्रिक ओआरवीएमसुद्धा आहे. थोडक्यात कार लोनचं फारसं ओझं न घेता कुटुंबाला छानशी कार खरेदी करून देऊ इच्छित असाल तर हा एक उत्तम पर्याय आहे.